Join us

तुरीला मिळतोय चांगला भाव, लाल, पांढऱ्या वाणासह गज्जर तुरीला क्विंटलमागे एवढा भाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 02, 2024 3:47 PM

राज्यात तुरीला सध्या चांगला भाव मिळत असून बाजारपेठेत लाल पांढऱ्या वाणासह गजर तूरही मोठ्या प्रमाणात येत आहे.

राज्यात तुरीला सध्या चांगला भाव मिळत असून बाजारपेठेत लाल पांढऱ्या वाणासह गजर तूरही मोठ्या प्रमाणात येत आहे. आज धाराशिव बाजार समितीत तिन्ही जातींच्या तुरीला चांगला भाव मिळत आहे. क्विंटल मागे दहा हजाराचा वर भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा विक्रीकडे कल वाढला आहे.

आज राज्यात एकूण 5567 क्विंटल तुरीची आवक झाली. यावेळी अमरावती बाजार समितीत सर्वाधिक आवक असून सर्वसाधारण 10 हजार 451 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

आज सकाळच्या सत्रात एकूण तीन बाजार समित्यांमध्ये तुरीला दहा हजारांवर दर मिळाला. इतर ठिकाणीही 9000 च्या वर भाव मिळत आहे.

जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीत काय मिळतोय दर?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/04/2024
अकोलालाल9557500108009900
अमरावतीलाल2667101001080310451
बीडपांढरा18640090007809
बुलढाणालाल1358900106009750
बुलढाणापांढरा5700092008000
धाराशिवलाल2598501017810025
धाराशिवपांढरा109700100559900
धाराशिवगज्जर9098001050010150
हिंगोलीलाल599400105009950
नागपूरलाल148590001046010095
नांदेडलाल149650101009775
परभणीपांढरा6800196009500
सोलापूरलाल18800099059000
यवतमाळलाल80900092009100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5567
टॅग्स :तूरबाजारमार्केट यार्ड