Join us

या पाच बाजारसमितीत तूरीला मिळतोय १२ हजारांहून अधिक भाव, जाणून घ्या..

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 29, 2024 4:24 PM

राज्यात दुपारी ४ वाजेपर्यंत ८ हजार ५४२ क्विंटल तूरीची आवक होत आहे.

राज्यात सध्या तूरीचे दर १२ हजारांवर पोहोचले असून आज लाल, पांढऱ्या तुरीसह गज्जर, व लोकल तुरीची आवक होत आहे. आज राज्यात दुपारी ४ वाजेपर्यंत ८ हजार ५४२ क्विंटल तूरीची आवक होत आहे. अमरावती बाजारसमितीत आज सर्वाधिक तुरीची आवक होत असून मिळणारा भाव १२ हजार १४५ रुपयांचा भाव मिळत आहे.

धाराशिव बाजारसमितीत आज गज्जर तुरीला सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे १२ हजार २७१ रुपयांचा भाव मिळत आहे. आज नागपूर, सोलापूर बाजारसमितींमध्येही तुरीला चांगला बाजारभाव मिळत आहे. पहायला मिळत असून आज बहुतांश बाजारसमितीत लाल, पांढऱ्या व गज्जर तुरीची आवक झाली.

या पाच बाजारसमितींमध्ये मिळतोय तुरीला १२ हजारांहून अधिक भाव

अमरावती बाजारसमिती- लाल तूर- सर्वसाधारण १२ हजार १४५ रु

धाराशिव बाजारसमिती- गज्जर तूर- १२ हजार २७१ रु

हिंगोली- लाल तूर- १२ हजार ५० रु

नागपूर- लाल तूर- १२ हजार ५०

सोलापूर- लाल तूर- १२ हजार ४०० रु

टॅग्स :तुराबाजारमार्केट यार्ड