अपुरा पाऊस आणि किडीमुळे सांगली जिल्ह्यासह राज्यातच हळदीचे उत्पादन घटले आहे. सध्या सांगलीमार्केट यार्डात हळदीची आवकही जेमतेम आहे. यामुळे चांगल्या प्रतीच्या हळदीला प्रतिक्विंटल ३० हजार, तर सरासरी प्रतिक्विंटल २२ हजार रुपयांचा दर मिळत आहे.
हळदीला मिळणाऱ्या दराचा विचार केल्यास यंदा शेतकऱ्यांना हळद मालामाल करेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.हळदीचे एक हजार हेक्टर क्षेत्र जत, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात एक हजार हेक्टर क्षेत्रात हळदी आहे. पाणीटंचाई व रोगामुळे उत्पादन घटले आहे.
हळद क्षेत्र घटलेमान्सून आणि परतीचा मान्सून पाऊस कमी झाल्यामुळे हळदीचे क्षेत्र घटले आहे. परिणामी उत्पादन घटणार आहे.
सध्याचे भाव काय?राजारापुरी हळदीला प्रतिक्चिटल सरासरी २२ हजार १ रुपयांचा दर मिळत आहे. चांगल्या प्रतिच्या हळदीला ३० हजार एक रुपया दर मिळत आहे.
हळद दर स्थिर राहणारहळद क्षेत्र कमी झाले आहे. यामुळे येत्या सहा महिन्यात हळद दर स्थिर राहणार आहेत. हळदीच्या दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.