सांगलीमार्केट यार्डात राजापुरी हळदीची या सप्ताहामध्ये ४५ हजार ९२२ क्विंटल आवक झाली होती. गेल्या सप्ताहापेक्षा दोन हजार ७८३.४ क्विंटलनी आवक घटली आहे. राजापुरी हळदीला सरासरी प्रति क्विंटल २१ हजार ७५० रुपये दर राहिला आहे. दरात तेजी असली तरी आवक घटल्याचे दिसत आहे.
अपुरा पाऊस आणि मागील चार वर्षांतील हळदीचे दर घटल्यामुळे शेतकऱ्यांनी अन्य पिकांना पसंती दिली होती. ४० टक्केपर्यंत हळदीचे क्षेत्र घटल्यामुळे आवक प्रचंड घटली आहे. हळदीचे सौदे सुरू झाल्यापासून प्रति क्विंटल १० हजार रुपयांपेक्षा जास्तच दर राहिला आहे.
मागील सप्ताहामध्ये प्रति क्विंटल १४ हजार २५० रुपये किमान दर होता. या सप्ताहामध्ये प्रति क्विंटल १६ हजारांवर किमान दर राहिला आहे. राहिला आहे. मागील सप्ताहापेक्षा या सप्ताहामध्ये दोन हजार ७८३.४ क्विंटलने हळदीची आवक घटली आहे.
शनिवारी निघालेल्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला प्रति क्विंटल किमान दर १५ हजार तर कमाल दर २० हजार रुपये होता. तसेच सरासरी १७ हजार ५०० रुपये दर होता. दर वाढत असले तरी हळदीची आवक घटत आहे.
हळदीला मागणी वाढली
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हळदीला चांगली मागणी आहे. तसेच हळदीचे उत्पादन जवळपास ३० ते ४० टक्के घटले आहे. हळदीची आवक यापुढे कमी असणार आहे. यामुळे हळदीचे दर तेजीतच असणार आहेत, अशी प्रतिक्रिया हळद व्यापाऱ्यांनी दिली.