मागच्या काही दिवसांपासून पिवळ्या सोन्याला (हळद) १५ ते १६ हजार ५०० रुपये मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दुसरीकडे मध्येच त्रुटी काढत ६०० रुपयांची घसरण केली ५०० ते लागली आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागच्या काही दिवसांपासून जवळाबाजार येथील मार्केटमध्ये हळदीच्या दरात थोडी घसरण होऊ लागल्याचे पहावयास मिळत आहे.
दुसरीकडे हळदीला १५ हजारांच्या पुढे भाव मिळ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. परिणामी हळदीची आवकही बाजारात वाढली आहे. हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार बाजारपेठ परिसरातील ५० ते ६० गावांसाठी जवळची आहे. येथील बाजारात शेतीमालाला चांगला भाव मिळत आहे म्हणून अनेक शेतकरी येथे शेतीमाल घेऊन येतात.
सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये व बाहेर हळद खरेदी सुरू झाली आहे. जवळाबाजारसह परिसरात हळदीचे क्षेत्र अधिक आहे. प्रारंभी हळदीला चांगला भाव मिळाला नाही. परंतु सध्या हळदीला १५ हजाराच्या पुढे भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आनंदी दिसुन येत आहे.
पाच वर्षानंतर मिळतोय १५ हजार रुपये भाव
हळद हे शेतकऱ्यांसाठी पिवळे सोने आहे. परंतु म्हणावा तसा भाव पाच वर्षापासून मिळत नव्हता. यावेळेस सर्वच शेतकऱ्यांना हळद मुबलक प्रमाणात पिकली आहे. आता व्यापाऱ्यांनी त्रुटी न काढता हळद पाहून भाव द्यावा. - ज्ञानोबा किसनराव चव्हाण, आडगाव, शेतकरी
सद्यस्थितीत बाजारपेठेत १५ हजार ते १६ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. स्वरे पाहिले तर खर्चाच्या मानाने मिळत असलेला भावही शेतकऱ्यांना कमीच पडत आहे. हळदीसाठी २५ ते ३० हजार रुपये भाव देणे आवश्यक आहे. -राम नेव्हल, वडद, शेतकरी
जवळाबाजार येथे हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे अनेक गावचे शेतकरी हळद घेऊन येऊ लागले आहेत. परिणामी बाजारपेठेत आवकही वाढली आहे. हळदीप्रमाणे इतर शेतीमालालाही शासनाने योग्य भाव देणे आवश्यक आहे. - लक्ष्मण सोळंके, आडगाव रंजे, शेतकरी
हेही वाचा - काय ते गार्डन, काय तो मंडप; शेतकरी जावई असलेल्या लेकीच्या लग्नाला शेतात हिरवळ