हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या आठवड्यात सरासरी एक ते दीड हजार क्विंटलची आवक होत असताना भावात सुमारे एक हजार रूपयांची घसरण झाली. त्यामुळे ४ डिसेंबर रोजी आवक निम्म्याखाली आल्याचे पहावयास मिळाले, या दिवशी केवळ ६७५ क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. सरासरी ११ हजार ७०० रुपये भाव मिळाला.
हिंगोली येथील संत नामदेव मार्केट यार्डात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सरासरी ३ ते ४ हजार क्विंटल हळदीची आवक होत होती. या दिवसांत भावही १५ हजारांपर्यंत गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. ऑक्टोबरपासून मात्र भावात घसरण होत गेली. ज्या शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने हळद विक्रीविना ठेवली त्यांना फटका बसला. तसेच व्यापाऱ्यांनीही चढ्या दराने हळद खरेदी केली असताना नंतर मात्र उतरली. त्यामुळे नुकसान सहन करावे लागले.
सध्या हळदीला १० हजार ९०० ते १२ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. भाव उतरल्याने हळदीची आवकही घटत असून, गेल्या आठवड्यात एक हजार ते १ हजार २०० क्विंटलची आवक होत होती. ४ डिसेंबर रोजी मात्र केवळ ६७५ क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. बहुतांश शेतकऱ्यांनीयापूर्वीच हळद विक्री केली आहे. त्यातच आता भावही घसरल्याने आवक मंदावत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र, येत्या काळात हळदीचे भाव व्यापाऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे. मात्र शेतकऱ्यांकडे आता तशीही वधारण्याची
कमीच हळद शिल्लक आहे.
सोयाबीन पुन्हा पाच हजारांखाली
- अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर येथील मोंळ्यात सोयाबीनने पाच हजाराचा पल्ला गाठला होता. गेल्या आठवड्यात जास्तीत जास्त ५ हजार २५० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, चार दिवसांत वधारलेले भाव घसरले असून, सोमवारी ४ हजार ५८५ ते ४ हजार ९१२ रुपये प्रतिक्चिटलचा भाव मिळाला. या दिवशी शेतकऱ्यांनी १ हजार ५०० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा येत असून, आवक घटण्याची शक्यता आहे. सोयाबीनला किमान सहा हजार रुपये भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
हरभऱ्याला मिळाला सहा हजारांचा भाव
- शासनाने हरभऱ्याला ५ हजार ३३५ रुपये हमी भाव जाहीर केला होता. जोपर्यंत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होते. तोपर्यंत मोंढ्यात आणि खुल्या बाजारात त्यापेक्षाही कमी भावात हरभऱ्याची खरेदी झाली.
- नाफेडचे खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर मात्र भावात वाढ झाली, सोमवारी ३० क्चिटल हरभऱ्याची आवक झाली होती. ५ हजार ८०० ते ६ हजार २१० रुपये भाव मिळाला.
- भाव वाढले असले तरी आता हरभरा शिल्लक नसल्यामुळे भाववाढीचा फायदा होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर आता नव्या हंगामात वाढीव भावाची अपेक्षा आहे.