सांगली : राजापुरी हळदीस विक्रमी दराचा उच्चांक मोडत मंगळवारी सांगलीमार्केट यार्डातील सौद्यात प्रति क्विंटलला ७० हजार रुपये दर मिळाला.
हळदीचा हा दर सोन्यापेक्षा अधिक मिळाला आहे. मल्लिकार्जुन तेली (रा. हदीगुंद, ता. रायबाग, जि. बेळगाव) या शेतकऱ्याने विक्रीस आणलेल्या राजापुरी हळदीला हा सर्वोच्च दर मिळाला.
सांगली मार्केट यार्डातील हळद सौद्यामध्ये संगमेश्वर ट्रेडर्स या अडत दुकानामध्ये हळदीला प्रति क्विंटल ७० हजारांचा दर मिळाला. मल्लिकार्जुन तेली (रा. हदीगुंद, ता. रायबाग, जि. बेळगाव) यांच्या राजापुरी हळदीला हा सर्वोच्च दर मिळाला.
शेतकऱ्याचे ११ पोत्यांचे एक कलम होते. हळदीची सर्वोच्च बोली खरेदीदार श्रीकृष्ण कॉर्पोरेशन या पेढीकडून लावण्यात आली. मंगळवारी सौद्यात १७ हजार ५२५ क्विंटल हळदीची आवक झाली होती.
यापैकी नऊ हजार ९,३५८ पोती इतकी विक्री झाली आहे. हळदीस कमीत कमी १६ हजार ५०० आणि जास्तीत जास्त ७० हजार दर मिळाला आहे. सरासरी प्रतिक्विंटल २० ते २५ हजार रुपये दर मिळाला.