Join us

Turmeric Market: विदर्भातील शेतकऱ्यांची हळद विक्रीला 'या' बाजारात पसंती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:46 IST

Turmeric Market : विदर्भात १७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाते. स्थानिक बाजारपेठेचा अभाव आणि वाशिमच्या बाजारात मिळणारे कमी दर यामुळे शेतकऱ्यांचा कल हळद विकण्यासाठी मराठवाड्यातील बाजारपेठांकडे दिसून येत आहे. कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर.

सागर कुटे

पारंपरिक पिकांना फाटा देत, विदर्भातीलशेतकरी हळदीसारख्या पिकांकडे (Turmeric  Crop) वळला आहे. विदर्भात १७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाते. स्थानिक बाजारपेठेचा अभाव आणि वाशिमच्या बाजारात मिळणारे कमी दर यामुळे शेतकऱ्यांचा कल हळद विकण्यासाठी मराठवाड्यातील बाजारपेठांकडे दिसून येत आहे.

कडधान्यांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे शेतकरी हळद उत्पादनाकडे वळताना दिसत आहेत. या पिकाला विदर्भात योग्य बाजारपेठा उपलब्ध नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांना विक्रीसाठी मराठवाड्यातील बाजारांमध्ये धाव घ्यावी लागते.

वाशिम, रिसोडमध्ये खरेदी

* वाशिम, रिसोड येथील बाजार समितीत हळद खरेदी केली जाते; परंतु याठिकाणी हिंगोली बाजारपेठेपेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मराठवाड्यातील बाजारपेठांनाच पसंती देत आहेत. * गुरुवारी रिसोडच्या बाजार समितीत कमाल १३,२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत, तर शुक्रवारी (७ फेब्रुवारी) रोजी वाशिमच्या बाजारात १२,६७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

दरवर्षी हळद उत्पादन घेतो. यंदाही शेतात हळद पिकाची लागवड केली आहे. एक महिन्यानंतर पीक काढणीला येत आहे. रिसोड ही जवळची बाजारपेठ आहे; परंतु दर कमी मिळतो. बुलढाणा जिल्ह्यातही बाजारपेठ उपलब्ध झाल्यास क्षेत्रातही वाढ होईल. - सचिन टिकार, शेतकरी, बोरी अडगाव

'वायगाव'ला बाजारपेठेत नकार

* विदर्भातील पीडीकेव्ही वायगाव वाण सर्वोत्तम मानले जाते; परंतु मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये या वाणाला पसंती मिळत नसल्याने विक्रीसाठी अडचणी येत आहेत.

* या बाजारपेठांमध्ये सेलमची विक्री जोरात असल्याचे व्यापारी सांगतात. बाजारपेठा विकसित न झाल्यामुळे हळदीच्या दरातही मोठी तफावत दिसून येते. लागवड क्षेत्र वाढत असताना हळदीच्या बाजारपेठा विकसित होणे गरजेचे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Turmeric Market: हळदीच्या दरात आली तेजी; असे वधारले दर वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीमराठवाडाहिंगोलीविदर्भ