Join us

turmeric Market: सांगलीत राजापूरी हळदीला झळाळी, क्विंटलमागे असा भाव मिळतोय

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 20, 2024 3:21 PM

महाराष्ट्रात हळदीची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली असून बाजारसमितींमध्ये वाहनांच्या रांगा लागत आहेत.

राज्यात सध्या हळदीला क्विंटलमागे चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे १३ ते १४ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. दरम्यान आज सांगलीत राजापूरी हळदीला चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे १८ हजार ५२५ रुपयांचा दर मिळाला. 

महाराष्ट्रात हळदीची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली असून बाजारसमितींमध्ये वाहनांच्या रांगा लागत आहेत. दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा हळदविक्रीकडे मोठा कल आहे.

नवीनतम बाजार दरांनुसार राज्यात हळदीची सरासरी किंमत १४७८० रुपये प्रतिक्विंटल असून कमीत कमी १३७०० रुपयांचा भाव सुरु आहे.१७ एप्रिल रोजी हिंगोलीत हळदीला सर्वसाधारण १४ हजार ७८० रुपयांचा भाव मिळाला. तो आता १६ हजार २५० रुपये क्विंटल असा आहे.

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/04/2024
सांगलीराजापुरीक्विंटल8608150002205018525
19/04/2024
हिंगोली---क्विंटल2805150001750016250
वाशीमलोकलक्विंटल3000135001720015000
मुंबईलोकलक्विंटल65160002200019000
बसमतलोकलक्विंटल1372132001780015500
सांगलीराजापुरीक्विंटल12855153002350019400
टॅग्स :बाजारसांगली