Join us

Turmeric Market: मार्केट यार्डात हळदीची आवक मंदावली; भाव स्थिर, काय मिळतोय बाजारभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 12:43 PM

हिंगोली येथील मार्केट यार्डात मागील चार दिवसांपासून...

हिंगोली येथील मार्केट यार्डात मागील चार दिवसांपासून हळदीची आवक मंदावली असून, सध्या १५ ते १६ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत असल्याची माहिती समितीने दिली.

हिंगोलीबाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरासरी ३ ते ४ हजार क्विंटल हळदीची विक्रमी आवक होत होती. यंदा भावही समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांनी आणखी भाववाढीची आशा न करता हळदविक्री केली. तर आता जिल्ह्यातील काही भागांत पेरणीची तयारी केली जात आहे तर काही भागांत हळद, कापूस लागवड करण्यात येत आहे. शेतकरी पेरणीच्या कामात गुंतल्याने मार्केट यार्डात हळदीची आवक मंदावली आहे.

१८ जून रोजी जवळपास एक हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती. तर सरासरी १४ ते १६ हजार रुपयांदरम्यान भाव मिळाला. तर या दिवशी भुईमुगाचेही बीट झाले. सुमारे ६०० क्विंटल भुईमूग विक्रीसाठी आला होता तर ६ ते ६ हजार ३०० मिळाला. रुपयांदरम्यान भाव तसेच सोयाबीनची आवक जवळपास २५० क्विंटल झाली होती. सोयाबीनची दरकोंडी मात्र कायम असून, ४ हजार ते ४ हजार ३०० रुपयांदरम्यान मिळाला. 

दरम्यान, जोपर्यंत पेरणीचे काम आटोपत नाही, तोपर्यंत मोंढा, मार्केट यार्डात शेतमालाची आवक मंदावलेली राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला.

टॅग्स :बाजारहिंगोलीसोयाबीन