राज्यात सध्या हळदीला क्विंटलमागे चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे १५ ते १८ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. दरम्यान आज हिंगोलीसह सांगलीत राजापूरी हळदीला चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे १७ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला.
महाराष्ट्रात हळदीची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली असून दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा हळदविक्रीकडे मोठा कल आहे. आल परभणीत नं १ जातीच्या हळदीला १५ हजार रुपयांचा भाव मिळत असून हिंगोलीत १६ हजार ३५० रुपयांचा भाव मिळाला.
नवीनतम बाजार दरांनुसार राज्यात हळदीची सरासरी किंमत १४७८० रुपये प्रतिक्विंटल असून कमीत कमी १३७०० रुपयांचा भाव सुरु आहे. ३० एप्रिल रोजी हिंगोलीत हळदीला सर्वसाधारण १६ हजार ३५० रुपयांचा भाव मिळाला. उर्वरित बाजारसमितींमध्ये काय मिळतोय भाव..
शेतमाल: हळद/ हळकुंड
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा | जात/प्रत | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|
29/04/2024 | |||||
हिंगोली | --- | 3150 | 15000 | 17100 | 16050 |
हिंगोली | लोकल | 3393 | 12500 | 20200 | 16350 |
नांदेड | राजापुरी | 13 | 14151 | 17000 | 14600 |
परभणी | नं. १ | 60 | 14500 | 15700 | 15000 |
परभणी | राजापुरी | 92 | 10000 | 16000 | 14320 |
सांगली | राजापुरी | 7253 | 14500 | 21100 | 17800 |
वाशिम | --- | 5505 | 12950 | 16225 | 14587 |
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) | 19466 |