Join us

turmeric market: हिंगोली, सांगलीसह उर्वरित ठिकाणी हळदीला मिळाला असा बाजारभाव

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 30, 2024 2:29 PM

जाणून घ्या आज हळद बाजार कसा?

राज्यात सध्या हळदीला क्विंटलमागे चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे १५ ते १८ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. दरम्यान आज हिंगोलीसह सांगलीत राजापूरी हळदीला चांगला भाव मिळत असून क्विंटलमागे १७ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला.

महाराष्ट्रात हळदीची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली असून दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा हळदविक्रीकडे मोठा कल आहे. आल परभणीत नं १ जातीच्या हळदीला १५ हजार रुपयांचा भाव मिळत असून हिंगोलीत १६ हजार ३५० रुपयांचा भाव मिळाला.

नवीनतम बाजार दरांनुसार राज्यात हळदीची सरासरी किंमत १४७८० रुपये प्रतिक्विंटल असून कमीत कमी १३७०० रुपयांचा भाव सुरु आहे. ३० एप्रिल रोजी हिंगोलीत हळदीला सर्वसाधारण १६ हजार ३५० रुपयांचा भाव मिळाला. उर्वरित बाजारसमितींमध्ये काय मिळतोय भाव..

शेतमाल: हळद/ हळकुंड

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
29/04/2024
हिंगोली---3150150001710016050
हिंगोलीलोकल3393125002020016350
नांदेडराजापुरी13141511700014600
परभणीनं. १60145001570015000
परभणीराजापुरी92100001600014320
सांगलीराजापुरी7253145002110017800
वाशिम---5505129501622514587
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)19466
टॅग्स :मार्केट यार्डसांगलीहिंगोली