अन्य पिकांच्या तुलनेत हळदीचे उत्पादन फायदेशीर ठरत असल्याने जिल्ह्यातील अधिकांश शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. मात्र, आवक वाढताच भाव पाडले जात असून गेल्या दोन महिन्यांत हळदीचे दर प्रतिक्विंटल दोन हजारांनी घसरल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
वाशिम जिल्ह्यातीलवाशिम आणि रिसोड या बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे शनिवार आणि सोमवारी हळदीची खरेदी केली जाते. दरम्यान, वाशिम बाजार समितीमध्ये २६ जुलै रोजी ५१०० क्विंटल हळदीची आवक झाली. त्यात कंडी आणि गटू या दोन्ही प्रकारातील हळदीचा समावेश होता.
दोन महिन्यांपूर्वी, २५ मे रोजी कंडीला १५,००० ते १६,८७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. तो घसरून १३,०५० ते १४,९९० रुपये झाला आहे, तसेच गटू हळदीला १४,५०० ते १६,१७५ चा दर होता. तो घसरून १२,५०० ते १४,२१० झाल्याचे दिसून आले. दरात झपाट्याने घसरण झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील हळद आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
26/07/2024 | ||||||
वाशीम | लोकल | क्विंटल | 3000 | 12500 | 14990 | 13050 |
सेनगाव | लोकल | क्विंटल | 240 | 11500 | 14700 | 12500 |
सांगली | राजापुरी | क्विंटल | 12 | 11500 | 17660 | 14580 |