Join us

Turmeric Market Price वाशिमच्या बाजारात आवक वाढताच; हळदीच्या दरात घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 5:44 PM

अन्य पिकांच्या तुलनेत हळदीचे उत्पादन फायदेशीर ठरत असल्याने जिल्ह्यातील अधिकांश शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. मात्र, आवक वाढताच भाव पाडले जात असून गेल्या दोन महिन्यांत हळदीचे दर प्रतिक्विंटल दोन हजारांनी घसरल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर उमटत आहे.

वाशिम जिल्ह्यातीलवाशिम आणि रिसोड या बाजार समित्यांमध्ये अनुक्रमे शनिवार आणि सोमवारी हळदीची खरेदी केली जाते. दरम्यान, वाशिम बाजार समितीमध्ये २६ जुलै रोजी ५१०० क्विंटल हळदीची आवक झाली. त्यात कंडी आणि गटू या दोन्ही प्रकारातील हळदीचा समावेश होता.

दोन महिन्यांपूर्वी, २५ मे रोजी कंडीला १५,००० ते १६,८७५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. तो घसरून १३,०५० ते १४,९९० रुपये झाला आहे, तसेच गटू हळदीला १४,५०० ते १६,१७५ चा दर होता. तो घसरून १२,५०० ते १४,२१० झाल्याचे दिसून आले. दरात झपाट्याने घसरण झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील हळद आवक व दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/07/2024
वाशीमलोकलक्विंटल3000125001499013050
सेनगावलोकलक्विंटल240115001470012500
सांगलीराजापुरीक्विंटल12115001766014580
टॅग्स :बाजारवाशिमशेती क्षेत्रशेतकरीविदर्भपीक