Join us

Turmeric Market: हळदीचा रुसवा जाता जाईना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 1:15 PM

Turmeric market : बाजारात सध्या हळदीचे दरात मंदीचे सावट आले आहे; त्यामुळे येत्या काळात हळदीचे भाव पुढे जातील का? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Turmeric market :

एप्रिल-मे महिन्यात हळदीचे भाव १८ हजारांवर पोहोचले होते; पण सध्या हळद बाजारात मंदीचे सावट असल्याने खरेदीदारातील बिटातील बोली वाढत नसल्याने नांदेड मार्केट कमिटी यार्डात हळदीचे भाव १५ हजार रुपयांच्यावर सरकत नाहीत, त्यामुळे दर वाढण्याच्या आशेने हळद विक्रीविना साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.पेरणी हंगामात व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हळदीची खरेदी करून विक्री केली; पण अजूनही पुढच्या व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचे पेमेंट येणे बाकी असल्याने लिलाव बाजारात सौदे करण्यासाठी नांदेड येथील व्यापारी पुढे येत नसल्याचे दिसून येते. नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हळदीचे भाव दोन महिन्यांतच अडीच ते तीन हजारांनी घसरले आहेत. त्यामुळे दर वाढण्याच्या आशेने हळद साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. दरवर्षी हळदीचे भाव चांगले असतात आणि हळद विक्रीसाठी बाजारात आल्यानंतर कमी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने मिळेल त्या भावात शेतमालाची विक्री करावी लागते; पण यावर्षी सुरुवातीला कमी असलेले भाव हळद विक्रीसाठी बाजारात आल्यानंतर वाढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना चांगले दरही मिळाले. मे महिन्यात हळदीचे दर स्थिर असताना पेरणीचा हंगाम सुरू झाल्याने दिवसेंदिवस हळदीचे भाव कमी होत गेले. त्यामुळे काही दिवसांत वाढतील, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी हळदीची विक्री न करता, वेअरहाउस व घरीच साठवून ठेवली आहे.हळदीची जास्त दिवस साठवणूक करायची असेल तर वेअरहाऊसमध्ये डंक लागू नये यासाठी गोळ्या टाकूण ठेवाव्या लागतात. परंतु अनेक शेतकऱ्यांनी शेतातून आणलेली हळद जशीच्या तशी ठेवल्याने हळदीला कीड लागण्याची शक्यता आहे.

१७,९०० रुपयांचा भाव आला १५ रुपयांवर, शेतकरी झाले हैराण■ येथील मोंढा मार्केट यार्डात हळदीचे भाव एप्रिल-मे महिन्यांत १८ हजारांवर गेले होते. २४ एप्रिलला हळदीला लिलावात जास्तीत जास्त १७ हजार ९०० रुपये, तर सरासरी १६ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.■ तर तीन महिन्यांनंतर म्हणजे १६ ऑगस्ट रोजी रोजी झालेल्या लिलाव बाजारात सर्वाधिक १५ हजार १८५, तर सरासरी १४ हजार ४०० रुपये इतका प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

 

टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्ड