नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये नव्या हळदीची आवक सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी हळदीला या वर्षातील सर्वोच्च १५ हजार ३७७ रुपये भाव मिळाल्याने हळद उत्पादकांना अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.
नवीन मोंढ्यात २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावात जवळा पांचाळ येथील शेतकरी शेख अहेमद यांनी आशा ट्रेडींग कंपनी येथे हळद विक्रीसाठी आणली होती. लिलावात त्यांच्या हळदीच्या ४५ कट्टा काडीला प्रतिक्विंटल १५ हजार ३७७ रुपयांचा भाव मिळाला, तर २० बंडा पोत्याला १३ हजार ३७७ रुपयांचा भाव मिळाला. नव्या हळदीची पहिली खरेदी खरेदीदार ठक्कर ब्रदर्स यांनी केली. यावर्षी नांदेडसह परभणी, हिंगोली या जिल्ह्यात हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. त्यामुळे यंदा हळद उत्पादकांना चांगले दिवस येतील, अशी चिन्हे आहेत.
पंधरा दिवसांपासून दरात होतेय वाढ
■ जानेवारी महिन्यात नांदेड मार्केट याति हळदीचे भाव दहा हजार रुपयांच्या खाली आले होते. पण, त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. जुन्या हळदीला सरासरी १२ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. पण, नच्या हळदीने दरात उच्चांकी घेतली आहे.
सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच
■ सध्या मोंढा यार्डात सोयाबीनला प्रतिक्विंटल ४४५० ते ४२०० तर सरासरी ४४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे मागील काही महिन्यां- पासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच असल्याचे दिसून येते.
दर टिकून राहतील काय?
■ हळदीला पहिल्या दिवशी प्रतिक्चिटलला १५ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला असला तरी हे दर मार्च-एप्रिल महिन्यांपर्यंत टिकून राहतील काय, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.