Join us

हळदीचे भाव घसरले; मार्केट यार्डात ७०० क्विंटल आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 10:10 AM

भाव १२ हजारांच्याच घरात, शेतकऱ्यांची निराशा

हिंगोली येथील मार्केट यार्डात १ जानेवारी रोजी ७०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. भाव मात्र बारा हजारांवर जात नसल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. अशीच परिस्थिती सोयाबीनचीही असून, पडत्या भावात विक्री करण्याची वेळ येत आहे.

बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात ऑगस्ट, सप्टेंबरदरम्यान हळदीला सरासरी १५ हजारांचा भाव मिळाला. त्यावेळी आणखी भाव वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली. परंतु, भाव वाढण्याऐवजी घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात हळदीचे दर सरासरी १२ हजारांवर गेले नाहीत.

१ जानेवारी रोजी मार्केट यार्डात हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. या दिवशी ७०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. सरासरी ११ हजार ५२७ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. सध्या समाधानकारक भाव मिळत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांची निराशा होत असून, भाववाढीची अपेक्षा आहे.

संबंधित वृत्त: हळद तीनशेंनी 'उजळली'; सोयाबीनचे दर स्थिर

पावसाचा लहरीपणा आणि येलो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन निम्म्याखाली आले. या परिस्थितीत किमान सहा हजारांचा भाव मिळेल अशी आशा होती. मात्र, सोयाबीन पाच हजारांचा पल्लाही गाठत नसल्याचे चित्र आहे. मोंढ्यात सध्या सरासरी ४ हजार ७०० रुपये क्विंटलने सोयाबीनची विक्री होत आहे.

नवी तूर बाजारात येण्याअगोदरच भावात घसरण; सोयाबीनही पडले

मोंढ्यात सोयाबीनची आवक घटली

एकीकडे उत्पादन निम्यावर आले असताना सोयाबीन पडत्या भावात विक्री करावे लागत आहे. किमान सहा हजार रुपये क्चिटलचा भाव अपेक्षित असताना पाच हजारही मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे. येणाऱ्या दिवसात भाव काही प्रमाणात का होईना वधारतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सध्या मोंढ्यात आवक मंदावल्याचे पहावयास मिळत आहे.

टॅग्स :मार्केट यार्डसोयाबीनतुरा