वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हळद १९ हजारांवर पोहोचली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी मोंढ्यात आवक वाढताच हळदीला १६ हजार ३०५ रुपयांचा दर मिळाला. आवक वाढताच २ हजार ७०० रुपयांनी दर कमी झाले. दरात तेजी- मंदी येत असल्याने हळद ठेवावी की विकावी, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मोंढ्यात पाडव्याच्या मुहूर्तावर ९ एप्रिल रोजी हळद कांडीस प्रतिक्विंटल १९ हजार दर मिळाला असून, आवकही चांगली होती. १० एप्रिल रोजी मोंढ्यात १० हजार कट्ट्याची आवक आली होती. बिटात दर्जेदार हळद कांडीस १६ हजार ३०५ रुपयांचा दर मिळाला. १४ हजार ८६६ हळदीचे सरासरी दर राहिले. मोंढ्यात आवक वाढताच हळदीच्या दरात घसरण झाली आहे.
दिनांक १० बुधवार रोजी राज्यातील हळद आवक व बाजारदर
शेतमाल : हळद/ हळकुंड
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
10/04/2024 | ||||||
रिसोड | --- | क्विंटल | 8001 | 12900 | 14875 | 13887 |
वाशीम - अनसींग | हायब्रीड | क्विंटल | 600 | 13500 | 15700 | 14500 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 19 | 16000 | 22000 | 19000 |
जिंतूर | नं. १ | क्विंटल | 5 | 14600 | 14600 | 14600 |
सांगली | राजापुरी | क्विंटल | 20211 | 15000 | 21500 | 18250 |