Join us

Kanda Bajar Bhav : सोलापुरात बाजारात आठवड्यात अडीच हजार ट्रक कांदा आवक.. चांगल्या मालास कसा मिळाला दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 1:37 PM

सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक आता वाढू लागली. दररोज सरासरी ४०० ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. मागील पाच दिवसांमध्ये दोन हजार ट्रक कांद्याची आवक झाली आहे.

सोलापूर : सोलापूरबाजार समितीत कांद्याची आवक आता वाढू लागली. दररोज सरासरी ४०० ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. मागील पाच दिवसांमध्ये दोन हजार ट्रक कांद्याची आवक झाली आहे.

दिवाळीनंतर नवीन कांदा विक्रीला येणार आहे. त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याची आवक मोठी असते. सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यातूनही कांद्याची आवक असते.

याशिवाय कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा, आळंद, बिदर या भागातूनही मोठ्या प्रमाणात कांदा सोलापुरात येतो. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे.

सध्या कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात माल येत आहे. मागील काही दिवसांपासून दर स्थिर आहे. सरासरी दर २५०० रुपयांपर्यंत आहे. चांगल्या कांद्याचा पाच हजार रुपयांपर्यंत दर आहे. शुक्रवारी ५७०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

मात्र, सरासरी दरात घसरण झाली आहे. २५०० रुपये क्विंटल दर असलेल्या कांद्याला २१०० रुपयांचा दर मिळालाआहे. त्यानंतर शनिवारी सरासरी दरात आणखी घसरण झाली. १८०० रुपयांपर्यंत दर खाली आला आहे.

कमाल दरात ५०० रुपयांनी घट झाली आहे. दिवाळीनंतर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. दररोज सरासरी आठशे त नऊशे ट्रक कांद्याची आवक होणार आहे. त्यामुळे दरात घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मागील आठवड्यातील आवक (प्रतिक्विंटल)

दिनांककमाल दर (रु.)सरासरी दर (रु.)
२१ ऑक्टोबर५५००२५००
२२ ऑक्टोबर५६००२५००
२२ ऑक्टोबर५६००२५००
२३ ऑक्टोबर५३००२४००
२४ ऑक्टोबर५७००२१००
२५ ऑक्टोबर५१००१८००

नियोजन होणे गरजेचेदरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीनंतर आवक वाढणार आहे. त्यामुळे मार्केटातील नियोजन कोसळण्याची शक्यता आहे. कारण, विक्री आलेला माल बाहेर काढण्यास दोन दिवस वेळ लागतो. त्यामुळे यार्डात आणि चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे डिसेंबर आणि आणि जानेवारीमध्ये आवक वाढणार, या दृष्टीने आताच नियोजन होणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यापारी, हमाल, शेतकरी यांची बैठक घ्यावी, अशी मागणी होत आहे.

दसऱ्यानंतर आवक वाढू लागली आहे. सध्या चांगल्या माल दरही चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पूर्णपणे वाळवून आणल्यास दर चांगला मिळतो. शेतकऱ्यांना कच्चा माल विक्रीला आणू नये. कच्चा मालामुळे दर कमी मिळण्याची शक्यता असते.  - नामदेव शेजाळ, कांदा विभागप्रमुख

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डसोलापूरपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतीदिवाळी 2024दसराकर्नाटक