अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शांतलिंगेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोज ४ ते ५ हजार पोती उदडाची आवक झाली आहे.
यंदाच्या हंगामात आतापर्यंत ६८ हजार पोती उडदाची आवक झाली आहे. पावसात भिजलेल्या मालालाही सध्या ६५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या दुधनी बाजार समितीत उडदाची आवक झाली आहे, तसेच मुगाची आवकही चांगली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ११ पोती मुगाची आवक झाली आहे.
सध्या उडदाला २२५० ते ६५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे, तर मुगाला ८ हजार ५५० रुपये भाव मिळत आहे. यंदा वेळेवर पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात खरिपाची पेरणी झाली होती.
शेतकऱ्यांनी उडीद पेरणी ही सरासरीपेक्षा दुपटीने केली आहे. इतर बाजार समितीच्या तुलनेत चांगला दर मिळत आहे, तसेच शेतकऱ्यांसमोर तत्काळ लिलाव करून जागेवर पैसे दिले जात असल्याचे सांगण्यात आले.
याकामी बाजार समिती आवारातील व्यापारी असोसिएशन अध्यक्ष बसवराज परमशेट्टी, राजशेखर दोशी, धन्नू ठक्का, जगदीश माशाळ, अंबुष्णा निवाळ, संजय जुला, शिवानंद माड्याळ, अशोक पादी आदी व्यापाऱ्यांनी समितीच्या सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या त्यावेळी मार्गी लावत आहेत.
पावसांपूर्वी रास झालेल्या उडदाला ८ हजार दरसतत झालेल्या पावसाने भिजलेल्या उडदाला प्रतिक्चिटल ६५०० ते ७००० दर आहे. आजही पावसापूर्वी रास झालेल्या चांगल्या दर्जेच्या उडदला ८ हजारांपेक्षा जास्त दर आहे. मागील अनेक वर्षांपासून उडदाची आवक वाढली आहे.
उडीद व मूग या शेती मालाला चांगल्या प्रकारे दर मिळत आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, तुळजापूर, उमरगा या तालुक्यातून माल येत आहे, तसेच कर्नाटकातील कलबुर्गी, आळंद, अफजलपूर तालुक्यातील माल येत आहे, तसेच लिलावावेळी काही अडचणी झाल्यास बाजार समितीच्या सचिवांकडे संपर्क साधावा. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाते. - अप्पू परमशेट्टी, सभापती, दुधनी बाजार समिती