Join us

Udid Bajar Bhav : महाराष्ट्रातील या बाजार समितीत ९० हजार क्विंटल उडदाची आवक अन् तब्बल ७० कोटी रुपयांची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 10:03 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात दोन महिन्यांत ९० हजार क्विंटल उडदाची आवक झाली आहे. उडदाला प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार रुपये दर मिळाला आहे.

करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात दोन महिन्यांत ९० हजार क्विंटल उडदाची आवक झाली आहे. उडदाला प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ८ हजार रुपये दर मिळाला आहे.

या हंगामातील दोन महिन्यांत उडदाची तब्बल ७० कोटी रुपयांची उलाढाल बाजार समितीमध्ये झालेली आहे. करमाळा बाजार समितीमध्ये विक्रीस आलेल्या शेतमालाचे लिलाव उघड पद्धतीने शेतकऱ्यांच्या समक्ष शेतमालाचे प्रतवारी करून केले जातात.

शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यास लिलावातील दर मान्य असल्यास शेतकऱ्यांची संमती घेतली जाते व त्यानंतर २४ तासांच्या आत शेतमालाची विक्री केली जातात. चालू खरीप हंगामामध्ये करमाळा तालुक्यात २३,५०० हेक्टर क्षेत्रावर उडदाची लागण झाली.

योग्य वेळी पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उडदाचे उत्पादन होऊन आवक मार्केट यार्डमध्ये झालेली आहे. चालू हंगामातील पुढे बाजारभावाचे अवलोकन केले असता, किमान ६५००, तर कमाल ८७५१ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल बाजार भाव मिळालेला आहे.

रोजच्या सरासरी धनाचा विचार करताना हमीभावाने दर दूर झाला मिळाला आहे. सत्तर ते ऐंशी दिवसात निघत आहे. त्यामुळे कमी कालावधीत येत असल्याने शेतकऱ्यांनी उडीद पेरणीवर भर दिला आहे.

इतर पिकांना रोगराई जास्त आहे. पेरणी यावर्षी झाली आहे. इतर पिकांच्या तुलनेत पुढील पिकाला रोगराई कमी आहे. उडीद पेरल्यानंतर मावा हा रोग काही प्रमाणावर दिसून आला.

अन्यथा कुठल्याही प्रकारचा रोग दिसला नाही. वेळेवर झालेला पाऊस व वेळेवर झालेली पेरणी यामुळे यावर्षी उडीद उत्पादन विक्रमी झाले आहे. बाजार भाव ही चांगला मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाची दररोज एक हजार क्विंटलची आवक होत आहे. मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने उशिरापर्यंत बाजार समितीच्या आडत बाजारात शेतमाल विक्री प्रक्रिया सुरू ठेवावी लागत आहे. यंदा तूर व मकाचे उत्पन्न चांगले मिळण्याची शक्यता आहे. - विठ्ठल क्षीरसागर, सचिव, करमाळा

टॅग्स :बाजारमार्केट यार्डपीकशेतकरीशेतीपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती