Join us

Udid Bajarbahv : माढा तालुक्यातील मोडनिंब बाजारात उडदाला मिळाला सर्वोच्च भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 1:26 PM

माढा तालुक्यातील मोडनिंब बाजारात उडदाची आवक वाढली आहे. प्रतिक्विंटल दर ८,२५० रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मोडनिंब : माढा तालुक्यातील मोडनिंब बाजारात उडदाची आवक वाढली आहे. प्रतिक्विंटल दर ८,२५० रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मोडनिंब येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आडत बाजारमध्ये १६०० पिशव्यांची आवक झाली होती.

माढा तालुक्यातील मोडनिब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळसी, भेंड भागातून, मोहोळ तालुक्यातील शेटफळ, तेलंगवाडी, खंडाळी, सिद्धेवाडी, पंढरपूर तालुक्यातील बार्डी, करकब, जाधववाडी, रोपळे या भागातून शेतकऱ्याचा माल मोडनिंबला येत आहे.

सध्या दर ही स्थिर असल्यामुळे शेतकरी वर्गामधून उत्साही वातावरण दिसत आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटलाल दोभाडा यांनी सांगितले की यंदाच्या वर्षी पाऊस वेळेवर झाल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली असली तरी दर स्थिर आहेत.

येणाऱ्या काळात पाऊस थांबल्यानंतर मार्केटमध्ये आणखी आवक वाढेल. त्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी आनंदात आहेत.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डपीकशेतकरीमाढापुणे कृषी उत्पन्न बाजार समिती