पुणे येथील गुलटेकडी तरकारी बाजारात राज्यासह परराज्यांतून येणारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्यांच्या तुलनेत स्थिर होती; मात्र पितृपंधरवडा सुरू असल्याने मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने टोमॅटो, फ्लॉवर, सिमलाच्या भावात वाढ झाली, घेवडा, कांदा भावात घट झाली असून अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (दि.२९) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेश येथून हिरवी मिरची ७ ते ८ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ७ ते ८ टेम्पो, कर्नाटकातून पावटा ३ ते ४ टेम्पो, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून शेवगा २ टेम्पो, इंदौर येथून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा ४ ते ५ टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून २ टेम्पो भुईमूग शेंग, मध्यप्रदेशातून लसूण सुमारे ८ ते १० टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ७०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ७ हजार क्रेट, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग ५०-६० गोणी, मटार पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा परिसरातून ८० ते १०० गोणी, कांदा सुमारे १०० ट्रक, इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० टेम्पो आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा नवीन | २५० - ३५० |
कांदा जुना | ३५० - ४२० |
बटाटा | २०० - ३०० |
लसूण | १७०० - २९०० |
आले (सातारी) नवीन | ३०० - ३५० |
आले (सातारी) जूने | ६०० - ६५० |
भेंडी | २०० - ३५० |
गवार | ४०० - ६०० |
टोमॅटो | ३५० -४०० |
दोडका | ४०० - ४५० |
हिरवी मिरची | २५० - ४५० |
दुधी भोपळा | १०० - २०० |
चवळी | ३०० - ४०० |
काकडी | १२० -१६० |
कारली (हिरवी) | ३०० - ३५० |
कारली (पांढरी) | २०० - २५० |
पापडी | ४००-४५० |
पडवळ | २५० - ३०० |
फ्लॉवर | ३५० -४०० |
कोबी | ८० - १२० |
वांगी | २०० - ३०० |
डिंगरी | ४०० - ५०० |
नवलकोल | ७० - ८० |
ढोबली मिरची | ५५० - ६०० |
तोंडली (कळी) | ३०० - ४०० |
तोंडली (जाड) | १५० - १६० |
शेवगा | १००० - १२०० |
गाजर | ३०० - ४०० |
वालवर | ५०० - ६०० |
कोहळा | १०० - १५० |
आर्वी | २०० - २५० |
घोसावळे | २५० - ३०० |
ढेमसे | २५० - ३०० |
भुईमूग शेंग | ४५० - ६०० |
पालेभाज्यांच्या दरात घसरण
■ गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. कोथिबीर, मेथीसह चाकवत, अंबाडी, मुळे आणि पालक यांसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात ३० ते ४० टक्क्यांनी घसरण झाली असल्याची माहिती व्यापाऱ्याऱ्यांनी दिली.
■ गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. २१) कोथिंबिरीची सुमारे दीड लाख जुडी, तर मेथीची ७० हजार जुडीची आवक झाली होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
कोथिंबीर : ५००-१०००, मेथी: ५००- १०००, शेपू: ५००-८००, कांदापात : ८००-१२००, चाकवत: ४००-६००, करडई: ३००-६००, दिना: ३००- ८००, अंबाडी: ४००-७००, मुळे: ७००-१२००, राजगिरा : ४००-७००, चुका: ५००-८००, चवळई: ३००- ७००, पालक ८००-१५००.
हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी