Lokmat Agro >बाजारहाट > Vegetable Market Rate : पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली; भाव वधारले

Vegetable Market Rate : पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली; भाव वधारले

Vegetable Market Rate : Inflow decreased due to loss of vegetables due to rain; Prices increased | Vegetable Market Rate : पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली; भाव वधारले

Vegetable Market Rate : पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली; भाव वधारले

पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे. पण पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दराने उसळी घेतली आहे.

पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे. पण पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दराने उसळी घेतली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने आवक घटली आहे. पण पितृपंधरवड्यामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातभाज्यांच्या दराने उसळी घेतली आहे.

ओला वाटाणा १५०, तर गवारी ८० रुपये किलो दर आहे. टोमॅटो, वरणा, प्लॉवरच्या दरातही वाढ झाली आहे.

शेवगाही वधारला....

दहा रुपयांना शेवग्याच्या तीन शेंगा असायच्या. मात्र, या आठवड्यात शेवग्याने चांगलीच उसळी घेतली आहे. सध्या किरकोळ बाजारात दहा रुपयांना एक शेंग आहे.

मेथी वीस रुपये पेंढी

पावसामुळे पाले भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातही मेथीला अति पाणी सहन होत नाही. त्यामुळे सध्या मेथीची पेंढी वीस रुपयांपर्यंत आहे.

परतीच्या पावसाने नुकसान

जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस कोसळला. त्याचा फटका भाजीपाल्याला बसला आहे. त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे भाजीपाल्याचे झाले आहे. त्याचा थेट परिणाम आवकेवर दिसत असून, त्यातून दरवाढ झाली आहे.

भाजीपाला दर काय?

वांगी६० 
ढब्बू७० 
घेवडा६० 
गवार८० 
ओला वाटाणा१५० 
टोमॅटो६० 
ओली मिरची४० 
कारली४५ 
भेंडी४० 
वरणा५० 
दोडका५० 
वाल४० 
बिनीस४५ 

पालेभाज्यांचे दर, प्रती पेंढी

मेथी - २०
पालक - १५
पोकळा - १५
शेपू - १२
लालमाट - १०

मुळात यंदा पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी आहे. त्यात पितृ पंधरवड्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढल्याने दरात वाढ दिसत आहे. - भारत मोहिते, भाजीपाला व्यापारी.

आमच्याशी व्हॉटसअप्प द्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा. 

Web Title: Vegetable Market Rate : Inflow decreased due to loss of vegetables due to rain; Prices increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.