Vegetable Market Update :
बदलत्या हवामानामुळे भाजीपाल्याचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. बुधवारी २१ ऑगस्ट रोजी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने समितीने कळविले आहे. राज्यातील बाजारात भेंडी, फ्लॉवर, काकडी आणि कोबी आवक किती झाली. आणि त्याला सर्वसाधारण दर काय मिळाला ते पाहुया.
असे आहेत दर
भेंडीची आवक २ हजार ५४१ क्विंटल झाली त्याला २ हजार १८१ दर प्रती क्विंटल प्रमाणे मिळाला.
फ्लॉवरची आवक ३ हजार ४६६ क्विंटल झाली. तर त्याला १ हजार ७६८ दर प्रती क्विंटल प्रमाणे मिळाला.
काकडीची आवक २ हजार २७२ क्विंटल झाली. तर त्याला १ हजार ४९९ प्रती क्विंटल प्रमाणे दर मिळाला.
तर कोबीची आवक ३ हजार ६७७ क्विंटल झाली. तर त्याला १ हजार ४३१ प्रती क्विंटल प्रमाणे दर मिळाला आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने दरही कमी झाले आहेत.