समर्थ भांड
गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पालेभाज्यांची लागवड कमी होते. त्यातच आता अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध भागात फळभाज्यांचे नुकसान झाले आहे, तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे राज्यातील विविध भागात शेवग्याच्या बागा जळाल्या आहेत. परिणामी, शेवगा सध्या शहरातील नवी भाजी मंडईत ७० रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे, तर इतर फळभाज्यादेखील महाग झाल्या आहेत. या तुलनेत मात्र कांदा- बटाट्यांचे भाव २० ते ३० रुपयांच्या आत आहेत. यामुळे 'कांदा- बटाटा परवडला. मात्र, शेवगा भाजीसाठी थोड्या दिवस थांबा,' असे म्हणण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.
कांदा-बटाटा ३० तुलनेने स्वस्त
मागील सहा महिन्यांत शेवगा २० उत्पन्न कमी झाले आहे. यामुळे राज्यातील सगळ्याच बाजारात सध्या शेवगा स्वस्त झाला आहे. या तुलनेने कांदा व बटाटा चांगलाच स्वस्त आहे. कांदा निर्यात बंदी उठविल्यानंतर कांद्याला चांगलाच भाव येईल असे वाटत होते. मात्र, कांदा निर्यात बंदी उठविल्यानंतर मागील महिनाभरापासून कांदा २० रुपयांपेक्षा अधिक महागला नाही. दरम्यान, सध्या बीड शहरातील नवीन भाजी मंडईत किरकोळ विक्रेते २० ते २५ रुपये किलोप्रमाणे कांदा विक्री करत आहेत, तसेच बटाटा ३० रुपये किलो या दराने विक्री होत आहे.
पालेभाज्या महागच
■ उन्हाळ्याचे दिवस असल्याने सगळ्याच पालेभाज्या सध्या महागल्या आहेत. त्यातच वातावरण बदल, ढगाळ वातावरण, उष्णतेचा प्रकोप व अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांसह इतर पिकांवरदेखील याचा विपरीत परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
■ मागील महिनाभरापासून अस्थिर वातावरणाचा पालेभाज्यांवर परिणाम होत आहे.
■ शेवगा फळधारणेच्या वेळी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेवगा- देखील ७० रुपयांवर पोहोचला आहे.
■ आगामी महिनाभरात शेवगा दर १०० रुपयांवर जाणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. भाज्यांचे दर वाढतच असल्याने सर्वसामान्यांना मात्र याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
गृहिणी म्हणतात
पावसाळ्यात नवीन बहार येईल, तोपर्यंत शेवगाचे दर वाढलेलेच राहतील. काळ्या मसाल्यातील शेवगा खाणे घरातील सर्वांनाच आवडते. मात्र, भाव वाढल्याने शेवगा अर्धा किलोच्या ऐवजी २५० ग्रॅम घ्यावा लागतो आहे.
अनिता बांगर, गृहिणी, बीड