Join us

थेट शेतकऱ्यांकडून कमी दरात आंबा खरेदी करायचाय? इथे भरलीय आंब्याची जत्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 10:33 AM

चोखंदळ पुणेकरांची फसवणूक टाळावी आणि वाजवी दरात अस्सल देवगड हापूसचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सव सुरू करण्यात आले आहे.

चोखंदळ पुणेकरांची फसवणूक टाळावी आणि वाजवी दरात अस्सल देवगड हापूसचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सव सुरू करण्यात आले आहे.

पणन मंडळाकडून आयोजित या आंबा महोत्सवात कोकण आणि विविध भागांतील शेतकरी आणि आंबा उत्पादक सहभागी होत आहेत. यामुळे पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून कमी दरात आंबा खरेदीची सुवर्णसंधी मिळणार आहे.

मार्केट यार्ड पुणे येथे विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्थान पुणे आणि देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसंडे (ता. देवगड) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या योजनेखाली दि. १ एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे छात्रावास इमारतीच्या आवारात आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे.

आंब्याचा हंगाम सुरू असून, मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक होताना दिसत आहे. पुणेकरांनी आंबा महोत्सवाला भेट देऊन उत्तम प्रतिचे, गोड, सुमधुर अस्सल देवगड हापूस आंबे खरेदी करावे, असे आवाहन आंबा महोत्सवातील स्टॉलधारक आंबा उत्पादक शेतकरी रामचंद्र करंदीकर, पराशय मोंडे, प्रथमेश देवळेकर व शैलेश घाडगे यांचे मार्फत करण्यात येत आहे.

टॅग्स :आंबाबाजारमार्केट यार्डपुणेपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीकोकण