Join us

कलिंगडाची आवक वाढली; दर २० ते १५० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 12:13 PM

कलिंगडाचा हंगाम बहरात आल्यानंतर आवक आणखी वाढेल. शुगर किंग जातीचे कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते. त्यामुळे फळ विक्रेते, तसेच ज्यूस सेंटर चालकांकडून याला मागणी असते. घरगुती ग्राहक छोट्या आकाराचे, निफाड, बीबीशकूर या जातीचे कलिंगड खरेदी करतात कलिंगडाचा हंगाम मार्चपासून सुरू होत असून, जून महिन्यापर्यंत असतो

राज्यभरात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून यामुळे नागरिकांची रसवंती, ज्यूस सेंटर आदींकडे पाऊले वळाली आहे. तसेच उन्हाळ्याची चाहूल लागताच जालना जिल्ह्यातील शहागड (ता. अंबड) येथील बाजारपेठेत कलिंगडाची आवक देखील वाढली आहे. वाढलेला उन्हाळा, रमजानचा महिना यामुळे कलिंगडाला मागणीही वाढली आहे. किरकोळ बाजारात एका कलिंगडाचे दर आकारानुसार २० ते १५० रुपयापर्यंत आहेत. 

सरबत विक्रेत्यांकडून देखील कलिंगडाला मागणी वाढली आहे. तसेच मंगळवारपासून रमजान महिन्यास प्रारंभ झाला असून, रमजान महिन्यात कलिंगडाच्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसते आहे.

कलिंगडाचा हंगाम बहरात आल्यानंतर आवक आणखी वाढेल. शुगर किंग जातीचे कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते. त्यामुळे फळ विक्रेते, तसेच ज्यूस सेंटर चालकांकडून याला मागणी असते. घरगुती ग्राहक छोट्या आकाराचे, निफाड, बीबीशकूर या जातीचे कलिंगड खरेदी करतात कलिंगडाचा हंगाम मार्चपासून सुरू होत असून, जून महिन्यापर्यंत असतो.

नवखे पीक ठरले फायद्याचे; शेतकऱ्याने साधला हंगाम

जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावरील अंबड व घनसावंगी तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केली आहे. त्यामुळे मागणीनुसार कलिंगड अंबड, घनसावंगी तालुक्यातच उपलब्ध होत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च व इतर खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे यंदा कलिंगडाचे भाव देखील आवाक्यात आहेत. - सोनू बागवान, कलिंगड व्यापारी.

शहागडमार्केटमध्ये होलसेल बाजारात एक किलोप्रमाणे विक्री केली जात आहे. यामध्ये कलिंगडाचे दर प्रतवारीनुसार २० ते दीडशे रुपये दर आहेत. -इरशाद बागवान, फळ विक्रेता