Join us

Weekly Kanda Market : राज्यात कांद्याची आवक 22 टक्क्यांनी वाढली, मागील आठवड्यात काय बाजारभाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 4:09 PM

Weekly Kanda Market : देशपातळीवर व राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Weekly Kanda Market : कांद्याची लासलगाव बाजारातील (Lasalgaon Kanda Market) मागील सप्ताहातील सरासरी किंमती  4433 रुपये प्रति क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत 2 टक्केनी वाढ झाली आहे. या आठवड्यात कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे. 

मागील आठवड्यातील कांद्याची (Onion Market) आवक पाहिली असता देशपातळीवर व राज्यात कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नाशिक जिल्हा वगळता इतर बाजार समितीमध्ये कांदा आवक कमी अधिक प्रमाणात झाल्याचा दिसून आलं. साधारण 01 लाख क्विंटलहुन अधिक कांद्याची आवक रोज होत असते. 

मागील आठवड्यात पिंपळगाव बाजारात कांद्याच्या किंमती 4685 रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक होत्या. तर सोलापूर बाजारात कांद्याच्या किंमती 3350 रुपये प्रति क्विंटल इतक्या होत्या. यात लासलगाव बाजारात 4103 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजारात 3350 रुपये प्रतिक्विंटल, पिंपळगाव बाजारात 4685 रुपये प्रतिक्विंटल, अहमदनगर बाजारात 03 हजार 950 रुपये प्रतिक्विंटल, तर पुणे बाजारात 4 हजार 210 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

आजचे कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/09/2024
कोल्हापूर---क्विंटल3352150051003300
अकोला---क्विंटल410300048003600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल896160044003000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल550250050004000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10617420052004700
खेड-चाकण---क्विंटल500300045004000
सातारा---क्विंटल124350050004250
राहता---क्विंटल1682170055004350
कराडहालवाक्विंटल75300045004500
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल249250053003900
धुळेलालक्विंटल360160050104450
जळगावलालक्विंटल245150243772950
नागपूरलालक्विंटल1000400050004750
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1981200047003350
पुणेलोकलक्विंटल10243300048003900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7250050003050
पुणे-मोशीलोकलक्विंटल419200050003500
मलकापूरलोकलक्विंटल43427048004310
कल्याणनं. १क्विंटल3450050004750
नागपूरपांढराक्विंटल1520420050004800
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल600170049314600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1100250048604700
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल501150060004800
कळवणउन्हाळीक्विंटल20550200054004700
मनमाडउन्हाळीक्विंटल700179150004675
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल9000250054004800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3240300050004700
देवळाउन्हाळीक्विंटल4680150050054780
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक