Join us

काय सांगताय.. ह्या रानभाजीचा दर २४० रुपये किलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:04 IST

मुसळधार पाऊस पडत असताना रानात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवल्या आहेत. अत्यंत चविष्ट व पौष्टिक असलेल्या या भाज्यांना चांगली मागणी आहे.

मुसळधार पाऊस पडत असताना रानात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवल्या आहेत. अत्यंत चविष्ट व पौष्टिक असलेल्या या भाज्यांना चांगली मागणी आहे. यामध्ये करटोली kartoli अधिक पसंतीस उतरत असून यंदा प्रतिकिलो २४० या दराने विकण्यात येत आहे.

गेल्या वर्षीपेक्षा ४० रुपये अधिक दर आहे. या वर्षी पाऊस लांबल्याने करटोली भाजीची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने रानात ही भाजी मिळत आहे.

मात्र या वर्षी ही भाजी काहीशी महाग असून गेल्या वर्षी २०० रुपयांना किलो असणारी भाजी यावर्षी २४० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. सुरुवातीच्या काळात करटोली भाजी महाग असली तरी पुढील काळात या भाजीचे दर खाली येतील असे विक्रेत्यांनी सांगितले.

लांबलेल्या पावसाने करटोली भाजी उगवण्यास उशीर झाला. मात्र दमदार पावसाने गेल्या काही दिवसांपासून रानात मिळत असून यातून रोजगार मिळत आहेत. सध्या २४० रुपये किलो आहे. काही दिवसांत दर उतरण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: ना लागवड, ना खत, ना मशागत कशा येतात एवढ्या पौष्टिक भाज्या

टॅग्स :भाज्याबाजारशेतकरीपीकपाऊस