Lokmat Agro >बाजारहाट > कापसानेही केली निराशा! दर अजूनही तळालाच; जाणून घ्या आजचे भाव

कापसानेही केली निराशा! दर अजूनही तळालाच; जाणून घ्या आजचे भाव

What is price cotton today agriculture farmer market yard | कापसानेही केली निराशा! दर अजूनही तळालाच; जाणून घ्या आजचे भाव

कापसानेही केली निराशा! दर अजूनही तळालाच; जाणून घ्या आजचे भाव

कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाचे उत्पादन घटल्यामुळे कापसाचे दर चढे राहतील अशी अपेक्षा होती पण कापसाच्या दरानेही शेतकऱ्यांची निराशा केली आहे. हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना कापूस विक्री करावी लागत आहे. किरकोळ बाजारात ७ हजारांपेक्षा जास्त दर मिळत असल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, आज राज्यातील कापसाचे दर ६ हजार ५०० रूपयांपर्यंत खाली आल्याचं चित्र आहे. कापसाची आणि तुरीची बाजारातील आवक वाढली असून ओला कापूसही संपला आहे. त्यामुळे सध्या आवक होत असलेला कापूस हा उत्तम प्रतीचा असूनही दर कमीच आहेत. आज अकोला (बोरगावमंजू) बाजार समितीत सर्वांत जास्त ७ हजार २१९ रूपये दर मिळाला तर संगमनेर बाजार समितीत ६ हजार ५०० रूपये एवढा सर्वांत कमी सरासरी दर मिळाला आहे. राज्यातील सरासरी दराचा विचार केला तर ६ हजार ८०० रूपये ते ६ हजार ९०० रूपये दर मिळाला आहे. 

अमेरिका, ब्राझीलसारख्या देशांतील कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्याचबरोबर भारतातही पावसामुळे कापूस उत्पादन कमी होत असल्यामुळे यंदा कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा होती. कापसाचे दर १० हजाराचा टप्पा ओलांडतील अशी अपेक्षा असताना ७ हजारांच्या आसपास कापूस विक्री करावा लागत आहे. 

आजचे कापसाचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/12/2023
संगमनेर---क्विंटल150600070006500
सावनेर---क्विंटल2100680068506850
राळेगाव---क्विंटल2800650070806850
भद्रावती---क्विंटल139680070006900
धारणीए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल100670068006750
आर्वीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल1395700070507030
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल320680068506825
अकोलालोकलक्विंटल102700071007050
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल126700074387219
मनवतलोकलक्विंटल1850705072307175
देउळगाव राजालोकलक्विंटल1200700071607100
वरोरालोकलक्विंटल1372620070616800
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल482670070006850
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल365680071757100
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल2500650071906800
यावलमध्यम स्टेपलक्विंटल101623070306820

 

 

Web Title: What is price cotton today agriculture farmer market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.