बाजारपेठेतटोमॅटोचेबाजारभाव गडगडले असून मागील साधारण १५ दिवसांपासून टोमॅटोला क्विंटलमागे ७०० ते १५०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.
आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये आज दि ९ मार्च २०२४ रोजी सकाळच्या सत्रात २८१० क्विंटल टोमॅटोची आवक झाली. लोकल, हायब्रीड, नं.१ तसेच वैशाली प्रतिच्या टोमॅटोची आवक होती. क्विंटलमागे टोमॅटोला कमीत कमी ८०० ते १५०० रुपयांपर्यंतचा दर मिळत असून जास्तीत जास्त २००० रुपयांचा दर मिळाला.
पुणे बाजारसमितीत ५१८ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. क्विंटलमागे आज १०२५ कमीत कमी तर १२२५ रुपये सर्वसाधारण दर मिळाला. शुक्रवारी तब्बल ३ हजार १२ क्विंटल टोमॅटोसाठी ८०० ते १००० रुपये भाव मिळाला. नागपूर बाजारसमितीत वैशाली टोमॅटोला १५०० ते १८०० रुपयांदरम्यान भाव मिळाला.
मागील १५ दिवसांपासून टोमॅटोला साधारण ५०० ते २००० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. परिणामी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून भाव पडल्याने नागरिकांना साधारण २५ ते ३० रुपये किलोने टोमॅटो बाजारात मिळत आहे.
कोणत्या बाजारसमितीत काय मिळताेय भाव?
शेतमाल: टोमॅटो
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|
09/03/2024 | |||
अहमदनगर | 42 | 1000 | 1175 |
कोल्हापूर | 230 | 500 | 1000 |
नागपूर | 700 | 1500 | 1650 |
नागपूर | 20 | 1510 | 1820 |
नागपूर | 400 | 1500 | 1875 |
पुणे | 518 | 1050 | 1225 |
रायगड | 805 | 1800 | 1900 |
सातारा | 51 | 800 | 1000 |
सोलापूर | 44 | 300 | 1300 |