Join us

टोमॅटोचे सध्या काय चाललेत भाव? क्विंटलमागे केवळ...

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 09, 2024 2:09 PM

आज राज्यातील या बाजारसमित्यांमध्ये लोकल, हायब्रीड, नं.१ तसेच वैशाली प्रतिच्या टोमॅटोची आवक होती.

बाजारपेठेतटोमॅटोचेबाजारभाव गडगडले असून मागील साधारण १५ दिवसांपासून टोमॅटोला क्विंटलमागे ७०० ते १५०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळत आहे.

आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये आज दि ९ मार्च २०२४ रोजी सकाळच्या सत्रात २८१० क्विंटल टोमॅटोची आवक झाली. लोकल, हायब्रीड, नं.१ तसेच वैशाली प्रतिच्या टोमॅटोची आवक होती. क्विंटलमागे टोमॅटोला कमीत कमी  ८०० ते १५०० रुपयांपर्यंतचा दर मिळत असून जास्तीत जास्त २००० रुपयांचा दर मिळाला. 

पुणे बाजारसमितीत ५१८ क्विंटल टोमॅटोची आवक  झाली. क्विंटलमागे आज १०२५ कमीत कमी तर १२२५ रुपये सर्वसाधारण दर मिळाला. शुक्रवारी तब्बल ३ हजार १२ क्विंटल टोमॅटोसाठी ८०० ते १००० रुपये भाव मिळाला. नागपूर बाजारसमितीत वैशाली टोमॅटोला १५०० ते १८०० रुपयांदरम्यान भाव मिळाला. 

मागील १५ दिवसांपासून टोमॅटोला साधारण ५०० ते २००० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. परिणामी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून भाव पडल्याने नागरिकांना साधारण २५ ते ३० रुपये किलोने टोमॅटो बाजारात मिळत आहे.

कोणत्या बाजारसमितीत काय मिळताेय भाव?

शेतमाल: टोमॅटो

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
09/03/2024
अहमदनगर4210001175
कोल्हापूर2305001000
नागपूर70015001650
नागपूर2015101820
नागपूर40015001875
पुणे51810501225
रायगड80518001900
सातारा518001000
सोलापूर443001300
टॅग्स :टोमॅटोबाजारमार्केट यार्ड