Join us

प्रजासत्ताक दिनी कांद्याचा बाजारभाव काय? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 3:04 PM

आज प्रजासत्ताक दिन असल्याने समित्या बंद असून सर्वच शेतमालाचे लिलाव बंद आहेत.

आज प्रजासत्ताक दिन असल्याने समित्या बंद असून सर्वच शेतमालाचे लिलाव बंद आहेत. त्यामुळे आज कांदा बाजारभाव देखील झाले नसून काही  बाजारसमित्यामध्ये कांदा लिलाव पार पडले. त्यानुसार आज कांद्याला सरासरी हजार रुपये बाजारभाव मिळाला.गेल्या काही सातत्याने बाजारभाव घसरत असून प्रजासत्ताक दिनी देखील शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे चित्र आहे. 

आज सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने अनेक बाजार समित्या बंद आहेत. मात्र एकीकडे कांदा बाजारभावात सततची घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे. शासनाकडून अद्यापही ठोस पाउले उचलली जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आज बाजार समित्या बंद असल्याने आवक ठप्प झाली आहे. काही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले. यात सोलापूर जिल्ह्यातील अकलूज बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 560 क्विंटल आवक झाली तर कमीत कमी 300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर सरासरी केवळ 900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. 

तर भुसावळ बाजार समिती केवळ 47 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली तर कमीत कमी दर 800 रुपये मिळाला तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मंगळवेढा बाजार समितीमध्ये आज 430 क्विंटल कांद्याची आवक झाली. या बाजार समितीत केवळ 100 कमीत कमीत भाव मिळाला. तर सरासरी 960 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. म्हणजेच आज देखील पुन्हा कांद्याची घसरण पाहायला मिळाली. 

टॅग्स :नाशिककांदामार्केट यार्डप्रजासत्ताक दिन २०२४