राज्यात मागील महिनाभरापासून सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत असून शेतकऱ्यांना हमीभावाहून सातत्याने कमी दर मिळत आहे. पणन विभागाच्या माहितीनुसार आज राज्यात ४ हजार ७४८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे सोयाबीनला ४२०० ते ४६०० रुपयांचा दर मिळत आहे.
सकाळच्या सत्रात आज अमरावती बाजारसमितीमध्ये राज्यात सर्वाधिक लोकल प्रतिच्या सोयाबीनची आवक झाली. प्रतिक्विंटल सोयाबीनला मिळणारा साधारण दर ४२०० रुपये होता. यावेळी शेतकऱ्यांना कमीत कमी ४१५० रुपये तर ४२५० रुपये जास्तीत जास्त भाव मिळाला.
धाराशिवमध्ये आज ६५ क्विंटल सोयाबीनला प्रतिक्विंटल ४४०० रुपये भाव मिळाला असून हिंगोलीत पिवळ्या सोयाबीनला ४२६० रुपये सर्वसाधारण भाव मिळाला. आज हिंगोलीत १०५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
लातूरमध्या आज १४० क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली. प्रतिक्विंटल ४२००ते ४४०० दरम्यान शेतकऱ्यांना भाव मिळाला असून मागील चार दिवसांपासून साधारण हाच भाव सुरु असल्याचे पणन विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
दरम्यान काल दि ५ मार्च रोजी दिवसाअखेर ३३ हजार ९१६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. काल सोयाबीनला ३९०० ते ४६०० दरम्यान सर्वसाधारण प्रतिक्विंटल दर मिळाला. काल बुलढाणा बाजारसमितीत सर्वाधिक सोयाबीनची आवक झाली होती.
शेतमाल: सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
जिल्हा | आवक | कमीत कमी दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|
06/03/2024 | |||
अमरावती | 4416 | 4150 | 4200 |
धाराशिव | 65 | 4400 | 4400 |
हिंगोली | 105 | 4220 | 4260 |
लातूर | 140 | 4200 | 4400 |
सांगली | 22 | 4630 | 4670 |