छत्रपती संभाजीनगर शहरात येणारा ७० टक्के गहू मध्यप्रदेशातून येत आहे. वार्षिक धान्य खरेदीचा हंगाम संपताच गव्हाचे भाव क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी वाढले आहे. यंदा पहिल्यांदाच उच्चप्रतीच्या शरबती गव्हाचे भाव होलसेल विक्रीत ५ हजारांवर जाऊन पोहोचले आहे.
देशात गव्हाचे भाव वाढत आहेत. मात्र असे असताना अनेक शेतकर्यांकडे सध्या गहू विक्री करिता उपलब्ध नसल्याने या दर वाढीचा फायदा कुणाला असे संभ्रमाचे चित्र शेतकरी वर्गात निर्मण झाले आहे.
व्यापारी फायद्यात
• व्यापारी वर्ग फायद्यात असल्याचे चित्र. कारण, हंगाम संपता संपताच गव्हाच्या भावात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांची तेजी आली आहे.
• राजस्थानचा गहू ३१०० ते ३४०० रुपये, गुजरात गहू ३४०० ते ३८०० रुपये प्रतिक्चिटलने विकत आहे. व्यापारी वर्गाकडे गहू साठवलेला.
का वाढले भाव
• मध्यप्रदेशात मध्यंतरी अवकाळी पावसाने गव्हाचे मोठे नुकसान झाले. मागील वर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी उत्पादन घटले आहे. उच्च प्रतीच्या शरबती गव्हाचे भाव ४८०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यात आता तेथील शेतकऱ्यांनी कमी भावात गहू विक्रीला विरोध केला आहे.
• यामुळे आवक थांबली, त्याचा परिणाम छत्रपती संभाजीनगरातील बाजारपेठेपर्यंत झाला. २०० रुपयांनी महागून शरबती गव्हाने क्चिटलमागे ५००० रुपयांना गाठले आहे. या गव्हात फायबर जास्त प्रमाणात असते.
• १२ तास या गव्हाची पोळी नरम राहते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. यामुळे या गव्हाचे भाव जास्त असते. सध्या शरबती गहू ३२०० ते ५ हजारांपर्यंत आहे.
५ हजारांचा गहू घेणारे ४ टक्केच ग्राहक
५ हजार रुपयांचा शरबती गहू खरेदी करणारे शहरात ३ ते ४ टक्के ग्राहक आहेत. हा वर्ग गहू कितीही महाग झाला तरी उच्चप्रतीचा शरबती गहूच खरेदी करतो. मात्र, बाकीचे सर्वसामान्य ग्राहक ३२०० ते ३७०० रुपये क्विंटल दरम्यानचा शरबती गहू खरेदी करतात. यातही १५० ते २०० रुपये वाढले आहेत. - नीलेश सोमाणी, व्यापारी.
हेही वाचा - Success Story दोन एकर केशर आंबा बागेतून उच्चशिक्षित तरुणाला ८ लाखांचे उत्पन्न