Join us

wheat market: राज्यात बन्सी, लोकलसह शरबती गव्हाची मोठी आवक, काय मिळतोय क्विंटलमागे भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 06, 2024 2:59 PM

पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ४२५ क्विंटल गव्हाची आवक झाली.

राज्यात शरबती गव्हासह बन्सी, लोकल, १४७ जातीच्या गव्हाची आवक होत असून सर्वसाधारण २५०० ते ४७०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. आज सकाळच्या सत्रात १४ हजार ७६२ क्विंटल गव्हाची आवक झाली.

पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ४२५ क्विंटल गव्हाची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना क्विंटलमागे सर्वसाधारण ४७०० ते५२०० रुपयांचा दर मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत आज लोकल व बन्सी गव्हाची मोठी आवक झाली. यावेळी २५२ क्विंटल बन्सी गहू शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. यावेळी क्विंटलमागे २८०० ते ३१०० रुपयांचा भाव मिळत असून लोकल गव्हाला २६०० रुपयांचा भाव मिळत आहे.

जळगावमध्ये १४७ जातीच्या ८१ क्विंटल गव्हाची आज बाजारपेठेत आवक झाली. यावेळी क्विंटलमागे  २४०० ते २५०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला. 

उर्वरित बाजारसमितीमध्ये काय सुरु आहे भाव?

शेतमाल: गहू

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/04/2024
अमरावतीलोकल1802245027502600
बुलढाणालोकल10220026012400
छत्रपती संभाजीनगरलोकल53250027752638
छत्रपती संभाजीनगरबन्सी252218030112604
धुळेलोकल500230031502800
जळगाव१४७81235325002425
नागपूरलोकल2454200026812424
नागपूरशरबती1655330036003550
नंदुरबार---300248127002541
पालघर---70315031503150
परभणीलोकल28240028002500
पुणेशरबती425420052004700
सोलापूरशरबती1132254039803030
वाशिम---6000217527902485
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)14762
टॅग्स :गहूबाजारमार्केट यार्ड