अकोला : गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले असून, येत्या ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्यानुसार राज्यातील परवानाधारकांना गव्हाच्या साठ्याची (wheat stock) माहिती शासनाच्या पोर्टलवर (Portal) सादर करणे आवश्यक आहे.
यासंदर्भात तपासणी करुन मर्यादेपेक्षा जास्त गव्हाची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या पुरवठा विभागामार्फत १० जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत गहू साठ्याची तपासणी करण्यात येणार असून, त्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त गव्हाची साठवणूक केल्याचे आढळून आल्यास संबंधित साठेबाजांवर कारवाई करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या १६ डिसेंबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार घाऊक, किरकोळ विक्रेता व प्रोसेसर्सकरिता गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत. त्यानुसार गहू साठा परवानाधारकांनी गहू साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन (Online) पद्धतीने घोषित करणे आवश्यक आहे.
पुरवठा विभाग करणार तपासणी
राज्यातील सर्व जिल्ह्यांत पुरवठा विभागामार्फत गहू साठ्याची तपासणी करण्यात येणार असून, मर्यादेपेक्षा जास्त साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित साठेबाजांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
शासनाच्या आदेशानुसार गहू साठा परवानाधारकांनी गहू साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात गहू साठ्याची तपासणी करण्यात येणार असून, त्यामध्ये निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साठवणूक केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पुरवठा निरीक्षक व भरारी पथकांना गहू साठ्याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. - निखिल खेमनार, जिल्हा पुरवठा अधिकारी
हे ही वाचा सविस्तर : Lavangi Mirchi Market Update:लवंगीचा तोरा उतरला; काय आहे कारण ते वाचा सविस्तर