Join us

wheat Market today: गव्हाला राज्यात कसा मिळतोय बाजारभाव? इथे सर्वाधिक दर

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 22, 2024 3:52 PM

शरबती, हायब्रीड, पिवळा, लोकल, बन्सी अशा वेगवेगळ्या जातींचा गहू बाजासपेठेत विक्रीसाठी येत असून या बाजारसमितीत गव्हाला सर्वाधिक दर मिळतोय.

राज्यभरातील बाजारसमित्यांमध्ये गव्हाची मोठी आवक होत आहे. मागील आठवड्यापासून गव्हाला साधारण २००० ते ५००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. दरम्यान आज राज्यात ८ हजार १२१ क्विंटल गव्हाची आवक झाली.

शनिवारी राज्यभरात २० हजार ८८८ क्विंटल गव्हाची आवक झाली. यावेळी शरबती, हायब्रीड, पिवळा, लोकल, बन्सी अशा वेगवेगळ्या जातींचा गहू बाजासपेठेत विक्रीसाठी आला होता.

आज मुंबई बाजारसमितीत लोकल गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून क्विंटलमागे ४५५० रुपयांचा दर मिळाला.  तर  सोलापूर बाजारसमितीत आज ४११ क्विंटल शरबती गव्हाची आवक झाली. सर्वसाधारण मिळणारा दर ४७०० रुपयांच्या दरम्यान होता.

वाशिम जिल्ह्यात आज ३००० क्विंटल गव्हाची आवक झाली. कमीत कमी २१३५ रुपये तर सर्वसाधारण २५१० रुपये भाव मिळाला. 

गव्हाचा हमीभाव काय?

रब्बी हंगामासाठी २०२४-२५ या हंगामासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत १५० रुपयांनी वाढ केली आहे.  २०२३-२४ या कालावधीसाठी गव्हाचा हमीभाव २१२५ रुपये एवढा होता .हा भाव दिडशे रुपयांनी वाढून आता प्रतिक्विंटल २२७५ रुपये भाव देण्याचे जाहीर  करण्यात आले आहे.

शेतमाल: गहू

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/04/2024
अकोलालोकल200202524252305
अमरावतीलोकल846250027502625
बुलढाणालोकल8220028502500
धाराशिवलोकल5260026002600
जळगाव१४७13260026002600
लातूर२१८९5376037603760
मंबईलोकल1696260065004550
नागपूरलोकल46190022012150
पालघर---153325032503250
पुणे२१८९46200032513000
पुणेशरबती411420052004700
सांगलीलोकल994300040003500
सोलापूरलोकल15290032102960
ठाणेलोकल680320036003400
ठाणेशरबती3280031003000
वाशिम---3000213526852510
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8121
टॅग्स :गहूबाजारमार्केट यार्ड