Wheat Market Update :
वाशिम :
गेल्या काही दिवसांत गव्हाच्या दराने उसळी घेतली असून प्रतिक्विंटल किमान २ हजार ४०० आणि कमाल २ हजार ६०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. यामुळे वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या शेतीमालाची दैनंदिन आवकही उच्चांकावर असून गेल्या ७ दिवसांत ३ हजार १७५ क्विंटल गव्हाची खरेदी-विक्री झाल्याची माहिती प्राप्त झाली.
खुल्या बाजारात दर ३५०० वर !बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतिच्या गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ६०० रुपये दर मिळत आहे. तोच गहू खुल्या बाजारात मात्र प्रतिक्विंटल ३ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिक दराने विक्री केला जात आहे.
फायदा व्यापाऱ्यांचा की शेतकऱ्यांचा?गेल्या काही दिवसांपासून गव्हाची आवक तुलनेने वाढलेली आहे. मात्र, खरीप हंगाम सुरू असून रबीला आणखी अवधी शिल्लक असल्याने हा गहू शेतकऱ्यांचा की व्यापाऱ्यांचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गव्हापेक्षा ज्वारीला अधिक दर!
सध्या बाजार समित्यांमध्ये विक्रीला येणाऱ्या ज्वारीला प्रतिक्विंटल १ हजार ९०० ते २ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. जो गव्हाच्या तुलनेत कमी आहे. मात्र, खुल्या बाजारात गव्हापेक्षा ज्वारीचे दर अधिक असल्याचे पाहावयास मिळत आहे.
परजिल्ह्यातूनही गहू येतोय विक्रीला!वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाला चांगला दर मिळत असल्याने परजिल्ह्यातील शेतकरी देखील त्यांचा माल याठिकाणी विक्रीला आणत असल्याचे दिसत आहे.
६ दिवसांत गव्हाची झालेली आवक !
सोमवार | ६५० |
मंगळवार | ४०० |
बुधवार | ४५० |
गुरुवार | ५५० |
शुक्रवार | ४६५ |
शनिवार | ६६० |