price crisis of turmeric : नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात एप्रिल-मे महिन्यात हळदीचे (Turmeric) भाव १८ हजारांवर पोहोचले होते. परंतु मार्केटमध्ये मंदी असल्याने हळदीचे भाव जवळपास तीन ते साडेतीन हजारांनी उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.यावर्षी सुरुवातीला कमी असलेले भाव नंतर मात्र वाढले. त्यामुळे काही शेतकऱ्यांना चांगले दरही मिळाले. मे महिन्यात हळदीचे दर स्थिर असताना पेरणीचा हंगाम सुरू झाला की, जून महिन्यांपासून कमी होत गेले. त्यामुळे काही दिवसांत वाढतील, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी हळदीची विक्री न करता, वेअरहाऊस व घरीच साठवून ठेवले आहेत.जुलै महिन्यात तरी हळदीचे भाव वाढतील, या आशेने शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली. पण, जुलै महिना संपत आला तरी १५ हजारांवर गेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे.
दोन महिने उलटूनही दर वाढलेच नाहीतहळद विक्रीसाठी बाजारात आली त्यावेळी येथील मोंढा बाजारात १८ हजारांपर्यंत भाव मिळाला. पण, आता सरासरी १४,६०० ते १५ हजार क्विंटलपर्यंत हळदीची विक्री होत आहे. दोन महिने उलटूनही दर वाढलेच नसल्याने हळदीची दरकोंडी कधी सुटणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.