Lokmat Agro >बाजारहाट > कापूस, सोयाबीनचा भाव कधी वाढणार? आवकही घटली, पैसाही फिरेना...

कापूस, सोयाबीनचा भाव कधी वाढणार? आवकही घटली, पैसाही फिरेना...

When will the price of cotton and soybeans increase? Income also decreased, money did not circulate... | कापूस, सोयाबीनचा भाव कधी वाढणार? आवकही घटली, पैसाही फिरेना...

कापूस, सोयाबीनचा भाव कधी वाढणार? आवकही घटली, पैसाही फिरेना...

बाजारात आवक घटली : सुताला ग्राहक नसल्याने पैसा फिरेना, शेतकरी अडचणीत

बाजारात आवक घटली : सुताला ग्राहक नसल्याने पैसा फिरेना, शेतकरी अडचणीत

शेअर :

Join us
Join usNext

बाजारातकापूस आणि सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच आहे. बुधवारी बाजारातकापूस ६८५० ते ६९५० रुपये तर सोयाबीनचा भाव ४६०० ते ४६६० रुपये होता. महिनाभरापासून भाव वाढत नसल्याने शेतकरी शेतमाल विक्रीला आणायचे टाळत असल्याने बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन मंदीत आहे.

तीन दिवसांपूर्वी ७०५० प्रतिक्विंटल भाव होते. परंतु सध्या हा भाव ६८५० ते ६९५० रुपये क्विंटल झाला, भाव कमी असल्याने शेतकरी गरज असेल तरच कापूस विक्रीला आणत आहेत. हे प्रमाण तुरळक आहे.

यार्नला उठाव कमी, गठान, सरकीतही घसरण

  • जागतिक बाजारपेठेत वार्नला मागणी नसल्याने उठाव कमी आहे. परिणामी कापूस दरात वाढ होऊ शकलेली नाही.
     
  •  गठानीचा भाव ५३ हजार २०० ते ५४००० हजार रुपये होते. तर सरकीचे दरही दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत उतरल्याने सध्या भाव २६५० ते २७५० रुपये होते.
     
  • 3 सुताला ग्राहक नसल्याने पैसा फिरत नसल्याची स्थिती सध्या बाजारात पाहायला मिळत आहे.

प्लान्टच्या दरात घसरण; सोयाबीन महिनाभरातच ६०० रुपये मंदीत

■ दिवाळीच्या वेळी सोयाबीन प्लान्टकडून ५ हजार ५०० रुपये भाव होता. त्यामुळे बाजारात सोयाबीनला ५३०० रुपयांपर्यंत भाव मिळाला; परंतु महिनाभरात प्लान्टचे भाव घसरले.

■ ४ हजार ८०० ते ४ हजार ९०० भाव मिळत आहे. परिणामी बाजारात ५०० ते ६०० रुपयांनी भाव कमी मिळाल्याने आवक कमालीची घटली आहे.

शेतकऱ्यांना आशा

कापसाचा भाव पुन्हा ८ हजार रुपयांपर्यंत होईल, या आशेने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस विक्री थांबविली आहे. तशीच स्थिती सोयाबीनची आहे. शासनाच्या धोरणामुळे सोयाबीनचा भाव बाजारात कमी असल्याचे व्यापारी सांगतात. कापूस ८ हजारापर्यंत तर सोयाबीन ५ हजारांच्या पुढे गेल्यास बाजारात आवक वाढू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

जिनिंग युनिटवर परिणाम

बाजारात पोषक वातावरण नसल्याने जिनिंग प्रेसिंगवरही परिणाम दिसत आहे. जिनिंग ५० टक्के क्षमतेने चालवल्या जात आहेत. जिनिंग चालकांकडे शेतकऱ्यांकडून आवक नसल्याने ते अहमदनगर, जालना, परभणी जिल्ह्यातून कापूस खरेदी करत आहेत. या क्षेत्राात काम कमी असल्याने मजूरही इतर ठिकाणी रोजगार शोधत आहेत.

Web Title: When will the price of cotton and soybeans increase? Income also decreased, money did not circulate...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.