Join us

बोल्ड जातीच्या हरभऱ्याला आज सर्वाधिक, गरडा, काबूली चण्याला कुठे कसा भाव?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 20, 2024 2:34 PM

कोणत्या हरभऱ्याला कुठे कसा भाव मिळाला? जाणून घ्या..

राज्यात आज सकाळच्या सत्रात ४३३५ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला सर्वाधिक भाव मिळत आहे. आज राज्यात विविध बाजारसमितीत लाल, गरडा, काट्या, काबुली चण्यासह लोकल हरभऱ्याची आवक झाली होती. आज अमरावती बाजारसमितीत सर्वाधिक लोकल हरभऱ्याची आवक होत असून दुपारी २ वाजेपर्यंत ३ हजार १३२ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली होती.

आज राज्यात जळगावात बोल्ड जातीच्या हरभऱ्याला क्विंटलमागे ९५५० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. काबुली चण्याला ७८०० रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. धाराशिवमध्ये काट्या, गरडा, व लाल हरभऱ्याची आवक झाली. यावेळी हरभऱ्याला सर्वसाधारण ५६०० ते ६०९६ रुपयांचा भाव मिळाला. पुण्यात हरभऱ्याला ७००० रुपयांचा भाव मिळाला.

कोणत्या हरभऱ्याला कुठे कसा भाव मिळाला? जाणून घ्या..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/05/2024
अमरावतीलोकल3132580062506025
बुलढाणालोकल3500057005700
चंद्रपुरलाल17550060505800
धाराशिवगरडा1560057005600
धाराशिवकाट्या40590061006000
धाराशिवलाल105570064926096
हिंगोलीलाल86585061506000
जळगावलाल3901590159015
जळगावकाबुली21760078007800
जळगावबोल्ड9955095509550
पुणे---43640076007000
वर्धालोकल205575060005875
वाशिम---250570061505900
यवतमाळलाल440540055005450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4355

टॅग्स :हरभराबाजारमार्केट यार्ड