गेल्या काही दिवसांपासून शेतमालाचे बाजार भाव उतरल्याने शेतकरी नाराज झाले आहेत, पिकवलेल्या शेतमालाचा उत्पादन आणि विक्रीसाठी येणारा खर्चही वसूल होत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. टोमॅटोला कमी भाव मिळाल्याने चांदोरी त्रिफुली येथे टोमॅटो रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली.- शेतकऱ्यांच्या शेतमालाला सध्या बाजारभाव नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.- सध्या जिल्ह्यात व निफाड तालुका टोमॅटोचा हंगाम सुरु आहे.- टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने पिंपळगाव नाशिक ओझर या ठिकाणी बाजार समितीमध्ये नेण्यासाठी येणारा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने संतप्त झाले.- शेतकऱ्यांनी नाशिक ते औरंगाबाद राज्य मार्गावरील चांदोरी त्रिफुली येथे टोमॅटो महामार्गावर ओतून दिला.- बळिराजाच्या सणालाच असे चित्र ग्रामीण भागात दिसून असल्याने शेतकरीवर्गामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
हे पण वाचा प्रक्रिया करून टोमॅटोचे भाव कसे वाढवायचे? आताच क्लिक करा