गेल्या वर्षी सुपारी बागायतदारांना ७,५२० मणास भाव मिळाला होता. यंदा ६,२०० रुपये देण्यात आले. गेला म्हणजे सभासदांना १,३२० रुपयांचा तोटा सहन करावा लागला. यामुळे यंदा सुपारीला कमी भाव का मिळाला असा प्रश्न बागायतदार विचारत आहेत.
सुपारी संघाचे माजी चेअरमन महेश भगत यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत अधिकची माहिती दिली आहे. मुरुड तालुका सुपारी खरेदी-विक्री संघाच्या विद्यमान कार्यकारिणीने एकाच विशिष्ट व्यापाऱ्यास बोलावून कोणतीही निविदा प्रक्रिया न करता असणारी ४० ते ५० टन सुपारी कमी भावात विकली. यामुळे बागायतदारांना हा तोटा सहन करावा लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी खुल्या निविदा प्रक्रियेची पद्धत का डावलली असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
कोरोनातही जास्त भावगेल्यावर्षी सुपारी बागायतदारांना ७५२० मणास भाव दिला होत. यंदा ६२०० रुपये भाव दिला असून चांगला दर दिला असल्याचे विद्यमान संघाचे म्हणणे आहे. मात्र कोरोना काळातही ६४०० रुपये भाव मिळाला होता.
चौकशीची मागणी- सुपारी संघाच्या प्रपत्रकात ५,९५० भाव लिहिला गेला. प्रत्यक्षात सभासदांना ६२०० रुपये भाव दिला. मग खरा भाव कोणता? असा प्रश्न यावेळी आदेश दांडेकर यांनी उपस्थित केला.- नवीन कार्यकारिणी सदस्यांनी ही कोटी रुपयांची एफडी महिनाभर करंट अकाऊंटमध्ये ठेवून दिली. त्यामुळे बागायतदारांच्या नियोजनशून्य असलेल्या पैशांचे व्याजाचे मोठे नुकसान झाले.- या सर्व गैरप्रकारामुळे ठराव झाले असून, संपूर्ण प्रकरणाची सहायक निबंधक यांच्याकडून चौकशीची मागणी केली आहे.
विद्यमान कार्यकारिणीवर अविश्वास येणे म्हणजे नामुष्की आहे. लोकांचे हित जोपासण्याकडे कार्यकारिणीने लक्ष द्यावे, आगामी दिवसात फरकाची रक्कम देऊ, असे कार्यकारिणीने जाहीर करावे. - जगदीश पाटील