Lokmat Agro >बाजारहाट > अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियाला रवाना

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियाला रवाना

Women Farmer Kalpa from Pathardi taluka of Ahmednagar district farm Pomegranate export to Australia | अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियाला रवाना

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियाला रवाना

अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंबाची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांनाही चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबाची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंबाची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांनाही चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबाची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंबाची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांनाही चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबाची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे.

विशेष म्हणजे पहिल्या खेपेतून जाणारी डाळिंबे ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा खक्कर यांच्या शेतातील आहेत. डाळिंब उत्पादनात भारत हा जगातील प्रमुख देश आहे, तर महाराष्ट्र हे प्रमुख देशातील प्रमुख डाळिंब उत्पादक राज्य आहे.

महाराष्ट्रात डाळिंबाची लागवड प्रामुख्याने सोलापूर, नाशिक, अहमदनगर, सांगली, पुणे, सातारा, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच बुलढाणा, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव व धुळे जिल्ह्यांमध्येही डाळिंबाचे क्षेत्र वाढत आहे.

या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या परिश्रमामुळे आणि विकिरण सुविधा केंद्राच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातील डाळिंबाचे फळ आता ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत प्रवेश करत आहे.

बागायती पिकांचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश असून  महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.

निर्यातीला चालना देण्यासाठी आणि पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने अपेडाने विशेषत: डाळिंबासाठी निर्यात प्रोत्साहन मंचाची (ईपीएफ) स्थापना केली आहे.

या ईपीएफ मंचांमध्ये वाणिज्य विभाग, कृषी विभाग, राज्य सरकारे, राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळा आणि आघाडीच्या दहा प्रमुख निर्यातदारांचा समावेश असून डाळिंब निर्यातीला चालना देण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्न सुनिश्चित करतात.

भारताचा डाळिंब उत्पादनाचा पहिला क्रमांक लागत असून सन २०२३-२४ मध्ये (७२ हजार टन) डाळिंबाची निर्यात झाली आहे. प्रामुख्याने संयुक्त अरब अमिराती, बहारीन, सौदी अरेबिया, श्रीलंका आदी देशांना ही निर्यात केली जाते.

तसेच युरोपियन देशांमधे इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड या देशांमधेही डाळिंबाची निर्यात होते. जागतिक बाजारपेठेत भारताव्यतिरिक्त स्पेन व इराण या देशांमध्येच निर्यातक्षम डाळिंब उत्पादित केले जाते. 

वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रात डाळिंबाच्या विकिरण प्रक्रियेच्या चाचण्या कार्यकारी संचालक संजय कदम यांच्या मार्गदर्शनाने व कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या.

चाचण्यांची माहिती एन.पी.पी.ओ. यंत्रणेमार्फत ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांना सादर करण्यात आली. कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावरील यशस्वी चाचण्यांमुळे सदर सुविधा केंद्र ऑस्ट्रेलियन यंत्रणेमार्फत व भारतीय एन.पी.पी.ओ. मार्फत प्रमाणित करण्यात आले.

ऑस्ट्रेलिया येथे डाळिंब निर्यातीकरिता कृषी पणन मंडळाची वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रावरील यशस्वी चाचण्यांमुळे सदर सुविधा केंद्र ऑस्ट्रेलियन यंत्रणेमार्फत व भारतीय एन.पी.पी.ओ. मार्फत प्रमाणित करण्यात आले.

ऑस्ट्रेलिया येथे डाळिंब निर्यातीकरिता कृषी पणन मंडळाची वाशी येथील विकिरण सुविधा ही देशातील एकमेव प्रमाणित सुविधा आहे. या सुविधेवरून अपेडा, भारत सरकार, एन.पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व के. बी. एक्सपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ऑस्ट्रेलियास डाळिंब निर्यातीचे नियोजन करण्यात आले.

या सविधा केंद्रावरूनच पहिली खेप पाठविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रगतिशील महिला शेतकरी कल्पा खक्कर यांच्या बागेमधील डाळिंबाची निवड करण्यात आली. अपेडाच्या सहकार्याने मे. के. बी. एक्सपोर्ट यांनी ऑस्ट्रेलियामध्ये ही पहिली खेप (कन्साईनमेंट) पाठविण्यासाठी पुढाकार घेतला.

डाळिंब कंटेनरसाठी के.बी. एक्सपोर्ट यांच्या पॅकहाउसमध्ये डाळिंबाची प्रतवारी करून त्यावर निश्चित केलेल्या प्रणालीनुसार प्रक्रिया करण्यात आली.

त्यानंतर हे डाळिंब ४ किलोच्या बॉक्समध्ये भरून त्यावर विकिरण सुविधा केंद्र आणि एन.पी.पी.ओ. यांच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीअंती व मान्यतेनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली.

कृषी पणन मंडळ, अपेडा व एन.पी.पी.ओ. यांच्या संयुक्त प्रयत्नाने डाळिंबाच्या ३२४ बॉक्सेसमधील १ हजार २९६ किलो डाळिंबांवर विकिरण प्रक्रिया करून हा माल विमानमार्गे ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न येथे रवाना करण्यात आला.

ऑस्ट्रेलियातील प्रदर्शनात मांडणार डाळिंब
ही डाळिंबे ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या फाइन फूड ऑस्ट्रेलिया या प्रदर्शनामध्ये अपेडामार्फत प्रदर्शित केली जाणार आहेत. त्याद्वारे तेथील स्थानिक ग्राहकांना आकर्षित करून भारतीय डाळिंबासाठी ऑस्ट्रेलियन बाजारपेठ काबीज करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. भारतीय डाळिंबांनी ही बाजारपेठ काबीज केल्यानंतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे के. बी. एक्सपोर्टचे संचालक कौशल खट्टर यांनी सांगितले.

Web Title: Women Farmer Kalpa from Pathardi taluka of Ahmednagar district farm Pomegranate export to Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.