Join us

Zendu Bajar Bhav : बाजारात झेंडू फुलांना मागणी वाढली कसा मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 12:55 IST

नवरात्रोत्सवासाठी फुलांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो दराने मिळणारी झेंडूची फुले आता ८० ते ९० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत.

नवरात्रोत्सवासाठी फुलांना मोठी मागणी असल्याने त्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ४० रुपये किलो दराने मिळणारी झेंडूची फुले आता ८० ते ९० रुपये किलो दराने विकण्यात येत आहेत. अन्य फुलांचा भावही वधारला आहे.

नवरात्रोत्सवासाठी फुलांना चांगली मागणी असल्याने निशिगंध, झेंडू, गलांडा, लिली, गुलाब या पारंपरिक फुलांसह डच गुलाब, जर्बेरा, कार्नेशिया आदी हरितगृहातील विदेशी फुलांनाही  मोठी मागणी असल्याने बाजारात दर दुपटीने वाढले आहेत.

मोठ्या आकारांची मूर्ती असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसह, घरगुती गणपतींच्या पूजेसाठी विविध प्रकारच्या फुलांना व फुलांच्या हारांना मोठी मागणी आहे.

म्हणून दर वाढयावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे फुले अधिक प्रमाणात खराब होऊन फुलांचे उत्पादन घटले आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढले आहेत. दर तेजीत असल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला.

शेवंतीने भाव खाल्लाफुले महागल्याने हारांच्या दरातही वाढ झाली आहे. किमान १०० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत फुलांच्या हारांची किंमत आहे. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या दुर्गा मातेच्या मूर्तीसाठीच्या हारांचे दर किमान ५०० रुपयांपासून दोन हजारांपर्यंत आहेत. ४० रुपये किलो मिळणारा झेंडू ८० ते ९० रुपये किलो आहे. मूर्ती पूजनासाठी लाल व पांढऱ्या फुलांना मागणी असल्याने दीडशे रुपये किलो मिळणारा निशिगंध साडेतीनशेवर व ८० रुपये किलोची शेवंती २२५ रुपयांवर पोहोचली आहे.

फुलांचे दर (प्रति किलो)निशिगंध ३५०झेंडू ८०गलांडा १५०गुलाब ४००-५००जरबेरा १२० डच गुलाब १३०कार्नेशियन १२०

टॅग्स :फुलंफुलशेतीबाजारमार्केट यार्डनवरात्रीशारदीय नवरात्रोत्सव २०२४