Lokmat Agro >बाजारहाट > Zendu Bajar Bhav : दसऱ्याला झेंडू खाणार का भाव कसा मिळेल दर

Zendu Bajar Bhav : दसऱ्याला झेंडू खाणार का भाव कसा मिळेल दर

Zendu Bajar Bhav : How to get Zendu flower market price on Dussehra | Zendu Bajar Bhav : दसऱ्याला झेंडू खाणार का भाव कसा मिळेल दर

Zendu Bajar Bhav : दसऱ्याला झेंडू खाणार का भाव कसा मिळेल दर

दसरा सणानिमित्त इतर फुलांपेक्षा झेंडूला सर्वाधिक मागणी असते. सध्या १०० रुपये किलोने मिळणारा झेंडू १५० रुपये किलोवर जाणार आहे. फुलांची आवक मुबलक प्रमाणात असली तरी पावसामुळे फुलांचा दर्जा खालावला आहे.

दसरा सणानिमित्त इतर फुलांपेक्षा झेंडूला सर्वाधिक मागणी असते. सध्या १०० रुपये किलोने मिळणारा झेंडू १५० रुपये किलोवर जाणार आहे. फुलांची आवक मुबलक प्रमाणात असली तरी पावसामुळे फुलांचा दर्जा खालावला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

दसरा सणानिमित्त इतर फुलांपेक्षा झेंडूला सर्वाधिक मागणी असते. सध्या १०० रुपये किलोने मिळणारा झेंडू १५० रुपये किलोवर जाणार आहे. फुलांची आवक मुबलक प्रमाणात असली तरी पावसामुळे फुलांचा दर्जा खालावला आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा अर्थात विजयादशमीनिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण असते. यंदा ऐन ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडल्याने दसऱ्याला झेंडूची फुले चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवात महाग झालेली झेंडूचे दर गणेशोत्सवानंतर कमी झाली होती. आता दसऱ्याला पुन्हा झेंडूचा भाव १५० रुपयांवर पोहोचणार असल्याचे फुल विक्रेते राजेश रावळ यांनी सांगितले. दसऱ्याच्या दिवशी झेंडूची आवक जास्त होणार आहे.

शुक्रवारपासूनच झेंडूचे दर वाढायला सुरुवात होईल. त्यानंतर झेंडूची मागणी कमी झाली तरी झेंडूचे दर वाढलेले असतील. बाजारात हजारो टन झेंडू आला असून फुले भिजलेली आहेत. त्यामुळे फुले लवकर खराब होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.

झेंडूची खरेदी शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज रावळ यांनी व्यक्त केला. पुणे, नारायणगाव, नाशिक या ठिकाणांहून झेंडूची सर्वाधिक आवक होते.

 बाजारात हजारो टन झेंडू आला असून फुले भिजलेली आहेत. त्यामुळे फुले लवकर खराब होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.

फुलांचे दर (रुपये किलो)
पिवळा, केशरी, रामधारी, केशरी, लाल कापरी झेंडू - १००
गुलाब बंडल - २००
मोगरा - १५००
कमळ - ३० प्रतिनग
पिवळी, सफेद, पर्पल शेवंती - ४००
जुई - १५००
अष्टर - ६००
आंब्याची डहाळी, भाताची - २० रुपये जुडी (प्रत्येकी नग)

Web Title: Zendu Bajar Bhav : How to get Zendu flower market price on Dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.