Zendu Market Rates : गणेशोत्सव आणि गौरीपूजनाच्या कार्यकमाचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. तर ग्राहकही आता नकली फुलांपेक्षा खऱ्या फुलांना पसंती देत असल्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. बऱ्याचदा शेतकरी दसऱ्याच्या निमित्ताने फुलाची लागवड करत असतात. पण ज्या शेतकऱ्यांची फुले गणेशोत्सवाच्या दरम्यान विक्रीसाठी येतात अशा शेतकऱ्यांना चांगला दर सापडतो.(Latest Market Yard Rates)
दरम्यान, सध्या बाजारात बिजली, शेवंती, पर्पल शेवंती, झेंडू, अमेरिकन काफरी वाणाचा झेंडी या सर्व फुलांना चांगला दर मिळताना दिसत आहे. अमेरिकन काफरी झेंडूला सध्या २०० रूपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. तर शेवंतीला १४० रूपयेत २४० रूपये किलोच्या दरम्यान दर मिळताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.
झेंडूचे दरही सध्या तेजीत असून पुणे बाजार समितीमध्ये सर्वसाधारणपणे ७५ रूपये प्रतिकिलोप्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळत आहे. बिजलीलाही बाजारात चांगला दर मिळत आहे. पुणे बाजार समितीमध्ये मागील काही दिवसांत १ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल ते २ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळताना दिसत आहे. गुलाबालाही २०० रूपये किलोच्या आसपास दर मिळत आहे.
गणेशोत्सव संपला की फुलांचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस असतात. पितृपक्षामध्ये फुलांना जास्त मागणी नसल्यामुळे थेट दसऱ्यासाठीच फुलांची मागणी वाढते. पण त्यावेळी अनेक शेतकऱ्यांची फुले बाजारात आलेली असल्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावा तसा दर मिळत नाही असं शेतकरी सांगतात. (Market Yard Flowers Rates Today)