Join us

Zendu Market : दसऱ्याच्या आधी झेंडूचे दर किती? बाजारात किती होतेय आवक?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 9:10 PM

Zendu Market : दसऱ्यानिमित्त बाजारात झेंडूला मोठी मागणी असते. त्यानिमित्ताने बाजारात होणारी आवकही मोठीच असते.

Zendu Market : दसरा एका आठवड्यावर येऊन ठेपला आहे. तर झेंडू उत्पादकांनी दसऱ्यासाठी लावलेला झेंडू बाजारात आणायला सुरूवात केली आहे. खऱ्या अर्थाने गणपती उत्सव, नवरात्र उत्सव-दसरा आणि दिवाळी या तीन उत्सवात झेंडूचे दर वाढलेले असतात. यंदा चांगला पाऊस झाल्याने लागवडी वाढल्याची शक्यता आहे. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने होणारी आवकही जास्तच असण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पणन मंडळाच्या माहितीनुसार आज कोणत्याच बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलाची आवक झालेली नव्हती. पण काल भुसावळ बाजार समितीमध्ये ५ क्विंटल फुलाची आवक झाली होती. तेथे २ हजार ३०० रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे. तर ५ ऑक्टोबर रोजी जळगाव, पुणे आणि भुसावळ या बाजार समितीमध्ये फुलांची आवक झाली होती. 

पुणे बाजार समितीमध्ये सध्या राज्यभरीतील सर्वांत जास्त दर झेंडूला मिळत आहे. ५ ऑक्टोबर रोजी येथे ४२४ क्विंटल झेंडूची आवक झाली होती. तर ३ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला होता. त्यापाठोपाठ जळगाव येथे १ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल तर भुसावळ येथे १ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. 

येणाऱ्या काळात दसऱ्यामुळे झेंडूचे दर वाढण्याची शक्यता आहे. पण फुलांची बाजारातील आवक वाढली तर दर खालीही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

सविस्तर झेंडूचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/10/2024
भुसावळलोकलक्विंटल5220025002300
05/10/2024
जळगाव---क्विंटल12150020001700
पुणेलोकलक्विंटल424100050003000
भुसावळलोकलक्विंटल12100020001500
टॅग्स :बाजारमार्केट यार्डशेतकरीशेती क्षेत्र